esakal | Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ७९ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ७९ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी ७९ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७४ हजार ५०२ झाली आहे. आज ६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६९ हजार ८३५ झाली आहे.

सध्या ९४४ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४५४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ३४६ रुग्ण उपचार घेत आहेत. ५९८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत २० लाख ५१ हजार ६०३ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

शहरात सध्या ४४ मेजर व ३७९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ४४० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ६९० जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top