esakal | Pimpri : बाधितांचे स्थानांतर केले, स्वच्छता कोण करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad

Pimpri : बाधितांचे स्थानांतर केले, स्वच्छता कोण करणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : इंदिरा गांधी उड्डाणपुलाखालील मटण मार्केटमध्ये ५० गाळे बंद पडली आहेत. अशा परिस्थितीत थेरगावातील गाळेधारकांचे त्याठिकाणी स्‍थानांतर केले आहे. मात्र सद्यःस्थितीत गाळ्यांची दुर्दशा झाली असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता करण्याची तसदी घेतली नसल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत गाळेधारकांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा: Dream 11 अ‍ॅप गोत्यात, गुन्हा दाखल; जाणून घ्या काय घडलं?

लोकवस्तीत असलेल्या दुकानांमुळे त्रास असल्याची नागरिकांची तक्रार होती. त्या तक्रारीवरून पिंपरी पुलाखाली महापालिकेने थेरगावातील मटण गाळेधारकांसाठी नवीन सहा गाळ्यांची व्यवस्था केली आहे. तसा मूळ भाडेकरारमध्ये बदल केला आहे. पण प्रत्यक्षात २० ते २५ वर्षापासून सुरू असलेली दुकाने स्थांनातर केल्यानंतर व्यवसाय चालेल की नाही, याविषयी गाळेधारकांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांचा व्यवसाय मागील आठ महिन्यापासून बंद आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि महापालिका सुद्धा असे अलॉटमेंट न देऊन त्यांची थट्टा करत आहे. थेरगावात ६ पैकी २ दुकाने चालविण्याची परवानगी देण्याची मागणी गाळेधारक करत आहेत. जुन्याठिकाणी अनेक घरांनी अतिक्रमण केले आहे. मटण व्यवसायामुळे कुत्रे येत असल्याची तक्रार आहे.

हेही वाचा: शिवलीला पाटीलच्या किर्तनाचे आयोजन आले अंगलट, गुन्हा दाखल

पण कुत्रे पकडण्याचे काम हे महापालिकेचे आहे. आमच्या पोटावर पाय का द्यावा? असेही काही दुकानदारांचे म्हणणे आहे. दरम्यान पुलाखाली आमचे स्थानांतर केले आहे. त्याठिकाणची अवस्था दयनीय आहे. निम्मे गाळे मोडकळीस आहे आहेत. सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. थेरगावातून गाळेधारकांचे केवळ स्थानांतर केले आहे. पण त्यांना सुविधा काहीच दिल्या नसल्याने गाळेधारकांनी ‘सकाळ’कडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा व्यवसाय मागील आठ महिन्यापासून बंद आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि महापालिका सुद्धा असे अलॉटमेंट देऊन त्यांची थट्टा करत आहे

‘‘अनेक वर्षापासून हा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यावर सामंजस्याने निर्णय होणे अपेक्षित होते. बाधित दुकानदारांना पिंपरी पुलाखाली जागा दिली आहे. त्यासाठी गाळे भाडेदर आकारण्यात येत आहे."

-मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी, भूमी व जिंदगी विभाग

loading image
go to top