Pimpri chinchwad : श्वानाने उघड्यावर शौच केल्यास मालकाला पाचशे रुपये दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri chinchwad : श्वानाने उघड्यावर शौच केल्यास मालकाला पाचशे रुपये दंड

श्वानाने उघड्यावर शौच केल्यास मालकाला पाचशे रुपये दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पाळीव श्वान, मांजर यांना अनेक जण सार्वजनिक ठिकाणी शौचास नेतात. त्यांच्या मालकांना पाचशे रुपये दंड करण्याच्या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेने गुरुवारी मंजुरी दिली.

हेही वाचा: बंदच्या हिंसक वळणाची जबाबादारी घेता का? रझा अकादमीने दिलं उत्तर

शहरातील भटकी कुत्री, जनावरांबाबतच्या तक्रारी सोडविण्यासह जखमी जनावरांवर मोफत उपचार केले जातात. मात्र, पाळीव जनावरांवरील उपचार व शस्रक्रियेसाठी वाजवी शुल्क आकारण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी जणावरांना शौचास नेणाऱ्यांवर दंड आकारण्याचा प्रस्ताव होता. त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. शिवाय, मानधन तत्त्वावर दोन पशुशल्यचिकित्सक नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना प्रत्येकी दरमहा ५० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे, त्यासही मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा: ST Strike : सरकारची विरोधकांशी चर्चा; तोडग्याची शक्यता!

असे असेल शुल्क

खासगी पाळीव प्राण्यांच्या (कुत्री,मांजरी) वैद्यकीय उपचारासाठी वीस रुपयांचा केसपेपर काढावा लागणार आहे. त्यांच्या ओपीडीसाठी दीडशे, एक्स-रेसाठी अडीचशे, सोनोग्राफीला साडेतीनशे, शस्त्रक्रियेसाठी चारशे रुपये मोजावे लागणार आहे. कुत्र्याच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी एक हजार दोनशे, तर मांजरासाठी तेराशे रुपये शुल्क करण्यात आले आहे.

माणसांवरही दंडात्मक कारवाई

शहराच्या काही भागात, विशेषतः काही झोपडपट्ट्या, लोहमार्ग, उपनगरांचा काही भागात आजही नागरिक सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौच करतात. अशा व्यक्तींवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. हागणदारीमुक्त शहर होण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.

loading image
go to top