कोविड केअर सेंटरचा हिशेब जुळेना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

महापालिका स्थायी समिती सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. कोरोना काळात पालिकेने कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्यातील भोसरीतील रामस्मृती लॉन्स येथील सेंटरमध्ये एकही रुग्ण नव्हता.

पिंपरी - कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेने कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्यातील रुग्णसंख्या, डॉक्‍टर व कर्मचारी संख्या, त्यांचा पगार व औषधोपचारावर झालेला खर्च, त्यांच्या संचालक संस्थांना दिलेला मोबदला, अद्याप देणे असलेला मोबदला याची माहिती गेल्या तीन आठवड्यांपासून स्थायी समिती सदस्य प्रशासनाकडे मागत आहे. मात्र, अद्याप पुरेशी व समाधानकारक माहिती मिळत नसल्याने आजच्या सभेसह तीन वेळा संबंधित विषय तहकूब करण्यात आले. त्यामुळे कोविड केअर सेंटर खर्चाचा हिशेब जुळेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास

महापालिका स्थायी समिती सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. कोरोना काळात पालिकेने कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्यातील भोसरीतील रामस्मृती लॉन्स येथील सेंटरमध्ये एकही रुग्ण नव्हता. अन्य सुविधाही नव्हत्या, तरीही त्यांना खर्चाची रक्कम देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आक्षेप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी घेतला. गेल्या तीन आठवड्यापासून सविस्तर माहिती सदस्य प्रशासनाकडे मागत आहेत, मात्र, ती दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला​

कोविड केअर सेंटरबाबतची सविस्तर माहिती, त्यावर झालेला खर्च व त्यांच्या संचलकांना द्यावी लागत असणारी रक्कम याबाबतचे सादरीकरण सोमवारी (ता. ८) केले जाणार आहे. तसेच, याच वेळी यांत्रिकी पद्धतीने अठरा मीटरपेक्षा रुंद रस्त्यांची साफसफाई करण्याचा विषयी स्थायी समिती समोर होता. त्याबाबतचे सादरीकरणही सोमवारी केले जाणार आहे. 

३५ कोटींच्या कामांना मंजुरी
स्थायी समिती सभेत ‘ड’, ‘ग’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील नदीपात्रालगतचा अनाधिकृत भराव काढून जमिनीची समतल पातळी करण्यासाठी सात कोटी ८४ लाख, ‘ड’ कार्यालयाअंतर्गत नदी व नाल्यांतील ड्रेनेज लाईन, चेंबर्सची देखभाल व दुरुस्तीची कामे ५३ लाख, प्रभाग १२ तील नाला दुरुस्तीसाठी २५ लाख, तळवडेतील रस्ते डांबरीकरणासाठी ४६ लाख, सोनवणेवस्ती, रुपीनगर व इंद्रायणीनगर परिसरातील रस्ते डांबरीकरणासाठी ३६ लाख, कासारवाडी मंडई विकसनासाठी एक कोटी ९० लाख, भक्ती-शक्ती चौकात ग्रेडसेपरेटर व उड्डाणपूल रोषणाईसाठी तीन कोटी ९९ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली.

बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात!

पार्किंग पॉलिसी एक मार्चपासून
शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी गेल्या वर्षी पार्किंग पॉलिसी आणली होती. मात्र, कोरोना व लॉकडाउनमुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. ती आता एक मार्चपासून केली जाणार आहे. शहराच्या विविध सहा भागांसाठी ही पार्किंग पॉलिसी असेल. 

पार्किंगसाठी सहा भाग
एक - निगडी- वाल्हेकरवाडी स्पाइन रस्ता, दापोडी ते निगडी पुणे-मुंबई जुना महामार्ग, निगडीतील टिळक चौक ते प्राधिकरणातील बिग इंडिया चौक, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी रेल्वे स्टेशन परिसर.

दोन - चिंचवड ते वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड स्टेशन ते हिंजवडी रस्ता, काळेवाडी फाटा ते ऑटो क्‍लस्टर बीआरटी मार्ग

तीन - केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट (ऑटो क्‍लस्टर) ते देहू-आळंदी रस्ता (चिखली), निगडी ते मोशी-भोसरी प्राधिकरण स्पाइन रस्ता.

चार - थेरगाव गावठाण रस्ता, थेरगाव फाटा ते लिंक रस्ता, औंध- रावेत बीआरटी रस्ता.

पाच - टेल्को रस्ता, नाशिक फाटा ते मोशी रस्ता

सहा - निगडीतील भक्ती-शक्ती चौक. शहरातील सर्व उड्डाणपुलांखाली, नाट्यगृहे व शहरातील मोकळ्या जागा

सर्व कोविड केअर सेंटर बंद; रखवालदार कायम 
शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी सुरू केलेले कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामध्ये जम्बो कोविड सेंटर नेहरूनगर, ऑटो क्‍लस्टर चिंचवड स्टेशन, घरकूल इमारती, मोशी प्राधिकरण सेक्‍टर चारमधील वसतिगृह, बालेवाडी वसतिगृह, म्हाळुंगे म्हाडा इमारती, भोसरी नवीन रुग्णालय आणि बालनगरी भोसरी या कोविड केअर सेंटरचा समावेश आहे. या ठिकाणी ५७ रखवालदारांचे मदतनीस नियुक्त केले होते. त्यांची मुदत डिसेंबरमध्ये संपली आहे. मात्र, भविष्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्यास उपाययोजना म्हणून या सेंटरमधील सामग्री कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये व्हेंटिलेटर, वैद्यकीय उपकरणे, खाटा, गाद्या आदींचा समावेश आहे. ही साधने चोरीला जाऊ नयेत, यासाठी रखबालदारांचे मदतनीस कायम ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्या मानधनासाठी होणारा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

तासासाठी शुल्क - ५ रुपये दुचाकी, रिक्षा
५ रुपये  दुचाकी, रिक्षा
२५ रुपये  मिनीबस
१०० रुपये ट्रक, खासगी बस
(एक रात्री व वर्षासाठीचे शुल्क निश्‍चित केले जाणार आहे.)

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad Covid Care Center