पिंपरी-चिंचवडमधील 'ड' प्रभागाला कोरोना मृत्युदर कमी करण्यात यश

पिंपरी-चिंचवडमधील 'ड' प्रभागाला कोरोना मृत्युदर कमी करण्यात यश

पिंपरी - कोरोनामुळे शहरातील एक हजार 736 रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक 312 मृत्यू "इ' प्रभाग कार्यालय क्षेत्रातील असून, रुग्णसंख्याही सर्वाधिक 18 हजार 347 झाली आहे. तुलनेने "ड' प्रभाग क्षेत्रात सर्वांत कमी 134 मृत्यू झाले असून, रुग्णसंख्याही सर्वांत कमी आठ हजार 482 राहिली आहे. सध्या शहरात संसर्गाचे प्रमाण कमी दिसत असले, तरी भीती अद्याप कायम आहे. त्यामुळे शहरात अद्यापही साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. 

शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च रोजी आढळला होता. तेव्हापासून रुग्णसंख्या वाढतच आहे. सोमवारी (ता. 21) सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्या 95 हजार 546 झाली होती. सध्या महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता रुग्णालयांसह नेहरूनगर व ऑटो क्‍लस्टर जम्बो कोविड सेंटर व खासगी रुग्णालयांत रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची संख्या केवळ 748 आहे. मात्र, घरीच राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या 958 आहे. दिवसाला शंभरच्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. गेल्या वीस दिवसांत तीन दिवस एकही रुग्ण आढळला नाही, अशी स्थिती राहिली.

बरे झालेले रुग्ण म्हणतात... 
चऱ्होलीतील 33 वर्षीय कामगार म्हणाला, ""मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. पण, कंपनीत दोन जण पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वांचीच तपासणी केली. त्यात माझा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. घरी दोन वर्षांची मुलगी व पत्नी आहे. आपल्यामुळे त्यांनाही संसर्ग झाला की काय? अशी भीती वाटली. पण, त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मी महाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये आठ दिवस होतो. आता काही त्रास नाही.'' 

काळेवाडीतील तरुण म्हणाला, ""माझ्यासह पत्नी व दोन्ही मुलांना आणि भाऊ व वहिनीलाही संसर्ग झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच घाबरलो होतो. कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. या घटनेला आता तीन महिने होत आहेत. पण, मनात भीती कायम आहे. कामावर असो, की सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क कायम असतो.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रभागनिहाय स्थिती 
प्रभाग/पॉझिटिव्ह/बरे झालेले/मृत्यू/एकूण 
अ/158/11596/299/12053 
ब/320/14245/272/14937 
क/162/8958/141/9261 
ड/204/8144/134/8482 
इ/303/17732/312/18347 
फ/145/10818/156/11119 
ग/256/11652/205/12113 
ह/158/8859/217/9234 
एकूण/1706/92104/1736/95546 

आकडे बोलतात (शहराबाहेरील रुग्ण) 
सध्या पॉझिटिव्ह- 95 
मृत्यू झालेले- 673 
बरे झालेले- 7306 
एकूण पॉझिटिव्ह- 8074 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com