पिंपरी-चिंचवड : दुकाने चालू ठेवण्यासाठी वेळेबाबत आज निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पिंपरी-चिंचवड : दुकाने चालू ठेवण्यासाठी वेळेबाबत आज निर्णय

पिंपरी : शहरातील दुकाने उघडी ठेवण्यासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत परवानगी आहे. हीच वेळ सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढवून मिळावी व विकएंड लॉकडाऊन कमी करावे यासाठी शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत थेट महापालिकेवर मोर्चा काढला होता. पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने चालू ठेवण्यासाठी वेळेबाबत आज काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. आज पुण्यात आढावा बैठकीत महापालिका आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा ढोरे हे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यापाऱ्यांची मागणी मांडणार आहेत.

सायंकाळी सात वाजेपर्यंत परवानगी देण्याची पिंपरी- चिंचवडमधील व्यापाऱ्यांची मागणी आहे. कोरोना महामारी, त्यानंतर लॉकडाऊन अशी संकटे एकापाठोपाठ एक आल्याने शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला व्यापारीवर्ग मोडून पडला आहे. शहरात व्यापार व्यवस्थित चालला नाही, तर अनेक गोष्टी ठप्प होणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने चालू ठेवण्यासाठी वेळ वाढवावी, अशी मागणी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार व भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनीही केली आहे. पिंपरी चिंचवडमधील व्यापारी संघटनांनाआमदार लांडगे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा: पुणे- सोलापूर महामार्गाला वाली कोण

आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात केले आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. की, गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात सर्वांचे नुकसान झाले आहे. कोरोनाचा काळ सुरु झाल्यापासून सर्वात मोठे नुकसान हे व्यापारावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे झाले. शहरातील कोरोनाचा संसर्ग कमालीचा कमी झाला आहे.तरीसुद्धा दुकाने उघडण्याची वेळ मर्यादा वाढवून देण्यात आलेली नाही.

राज्य शासनाच्या सुचनेनुसार कोरोना पोझिटीविटी दर विचारात घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्बंधाबाबत निर्णय घ्यावा असा आहे. पण शहरातील कोरोना संख्या कमी असताना लोकहिताच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत

सध्या शहरातील दुकाने उघडी ठेवण्यासाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत परवानगी आहे. हीच वेळ सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढवून मिळावी व विकएंड लॉकडाऊन कमी करावे यासाठी शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत थेट महापालिकेवर मोर्चा काढला .हा मोर्चा म्हणजे त्यांच्या रोषातून दिसलेला एक टाहो होता. हा मोर्चा म्हणजे गेल्या वर्षभरापासून पोटाची खळगी भरण्याची धडपड होती. निर्बंध कायम ठेवणे म्हणजे व्यापारांवर एकप्रकारे अन्याय होईल यासाठी आपल्या स्थरावर वेळ वाढवणेबाबत निर्णय घ्यावा.

हेही वाचा: पुणे- सोलापूर महामार्गाला वाली कोण

सद्यस्थितीत राज्य शासन नियमावलीनुसार विविध जिल्हात वेगवेगळे निर्बंध आहेत. परंतू पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी असून सुद्धा निर्बंध जैसे थे आहेत. लोकहिताची बाब म्हणून दुकाने चालू ठेवण्याची वेळ सायंकाळी सातपर्यंत आणि विकएंड लॉकडाऊन कमी करणेबाबतचा निर्णय तात्काळ घेऊन सहकार्य करावे असेही लांडगे यांनी म्हटले आहे.

Web Title: Pimpri Chinchwad Decision On Time To Keep Shops Open Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top