PCMC
PCMCSakal

पिंपरी : जमीन विकू पण नगरसेवक होऊ!

निवडणुकीसाठी इच्छुकांची खर्चाची तयारी; पैशाची जुळवाजुळव सुरू

पिंपरी : निवडणूक लढवून निवडून येण्यासाठी इच्छुकांची वाटेल ते करण्याची तयारी आहे. पैशांची गरज भासणार असल्याने काहींनी गावाकडील जमीन विक्रीचीही तयारी ठेवली आहे. युवा नेता, पक्षाचा पदाधिकारी अन् आता लोकप्रितिनिधी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा वडिलोपार्जित जमिनीवर डोळा असल्याचे दिसून येते.

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासह पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी मिळाली तरी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार, हे स्पष्ट आहे. एवढा पैसे कुठून उभा करणार, असा प्रश्न असताना काहींनी त्यादृष्टीनेपी तयारी सुरू केली आहे. खर्च अधिक असून निवडून येईल की नाही याची खात्री नसल्याने कुटुंबीय विरोध करतात. नको, या फंद्यात पडू असे सांगतात. मात्र, तरीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा चंग बांधला आहे. खर्चासाठी स्वकमाईचे पैसे नसले तरी काही इच्छुकांचा वडिलार्जित, गावाकडील जमिनींवर डोळा असल्याचे दिसून येते. जमिनीचा एक कोपरा विकायचा अन निवडणूक रिंगणात उतरायची तयारी सुरू केली आहे. यासाठी काहींनी तर जमीन व्यवहाराची बोलणीही सुरू केली आहेत.

PCMC
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवावर यंदा कोरोनाचं सावट; स्थानिक प्रशासनाच्या सूचनांची प्रतीक्षा 

लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न

युवा नेता, पक्षाचा पदाधिकारी अन् नंतर लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न पाहणारे अनेक जण आहेत. निवडणुकीला उभे राहा असे चार-चौघे म्हणत असले तरी वस्तुस्थिती पाहणे आवश्यक आहे. निवडणूक लढवायला आपल्याला पोषक वातावरण आहे का, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मात्र, कोणीतरी झाडावर चढवले म्हणून रिंगणात उतरून अपयश आल्यास मोठे नुकसान सहन करावे लागते.

कुटुंबीयांनाच विरोध

प्रत्यक्षरीत्या निवडणूक खर्चाला मर्यादा असली तरी अप्रत्यक्षरीत्या किती खर्च होऊ शकतो, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे एवढा खर्च शक्य आहे का, असा सवाल उपस्थित करीत कुटुंबीय निवडणूक लढविण्यास विरोध करतात. मात्र, अगोदरपासूनच चंग बांधलेल्या इच्छुकांची ऐकण्याची मनःस्थिती नसल्याचे दिसून येते.

रामराम नाहीतर ‘लांब-लांब’

महापालिका असो की इतर कोणतीही निवडणूक असो, त्यात निवडून येणे आव्हानात्मक असते. अनेकांच्या स्पर्धेतून बाजी मारताना मोठी कसरत करावी लागते. निवडून आल्यास मानसन्मान वाढतो, प्रतिष्ठा मिळते. मात्र, पराभूत झाल्यास जवळचेही दूर जातात. ज्याच्यासाठी धावलो, तेही जाणीव ठेवत नाहीत. रामराम करणारेच नंतर लांबलांब जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com