
पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहरांना मानांकन देण्यात येते. त्यात उद्योगनगरीला 'ओडीएफ++' मांनाकन मिळाले आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
केंद्र सरकारच्या पथकाने 14 ते 17 डिसेंबर या कालावधीत शहरातील स्वच्छतेची पाहणी केली. यात मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक व सार्वजनिक स्वच्छतागृह आणि सार्वजनिक मुताऱ्यांची तपासणी केली. त्यानुसार मानांकन जाहीर करण्यात आले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने महापालिकेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्याला सर्व नागरिकांच्या योगदानामुळे यश आले आहे. यात विशेषतः स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऑनलाइन नोंदविलेल्या सहभागामुळे महापालिकेला 'ओडीफ++' मांनाकन मिळाले असल्याचे डॉ. रॉय यांनी नमूद केले.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्र व राज्य सरकारची मदत
स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक अथवा कौटुंबिक स्तरावर स्वच्छतागृहे बांधणीसाठी 16 हजार रुपये अनुदान दिले जाते. यात आठ हजार रुपये केंद्र सरकारचा हिस्सा आणि प्रत्येकी चार हजार रुपये राज्य सरकार व महापालिकेचा हिस्सा आहे. शहरासाठी मंजूर 15 हजार 742 वैयक्तिक अथवा कौटुंबिक स्वच्छतागृहांसाठी केंद्र व राज्य सरकारने 1353.74 लाख रुपये अनुदान दिले आहे. तर, महापालिकेने 444.58 लाख रुपये खर्च केले आहेत. तसेच, शहरात सामुदायिक स्वच्छतागृहांची सुद्धा उभारणी केली आहे. त्याअंतर्गत 582 सिटस्चे स्वच्छतागृहे उभारली आहेत. त्यातील 262 महिलांसाठी व 320 पुरुषांसाठी आहे. या जोरावर शहराने 'ओडीएफ++' मानांकन प्राप्त केले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दृष्टिक्षेपात स्वच्छतागृहे