pimpri chinchwad
pimpri chinchwad sakal

Pimpri-Chinchwad : कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव परिसरातील सिलिंडर मधून क्लोरिंग गॅस गळती

पंधरा जणांना त्रास, त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड - घटनास्थळी पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र ०१ वॉटर टेंडर व बी. ए. वाहन, भोसरी उप अग्निशमन केंद्र ०१ वॉटर टेंडर वाहन दाखल झाले. जयंत जमदाडे यांनी मुख्य अग्निशमन केंद्र येथे फोनवरून कासारवाडी जलतरण तलाव या ठिकाणी गॅस लिकेज झाल्याचे सांगितले. सदरची गॅस लिकेज वर्दी प्राप्त होतात मुख्य अग्निशमन केंद्रातील दोन अग्निशमन वाहने व भोसरी उपग्निशमन केंद्रातील एक अग्निशमन वाहन घटनास्थळी तात्काळ रवाना करण्यात आली,

घटनास्थळी जलतरण तलावाच्या पाण्याला शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन वायुची टाकी गंज पकडून जीर्ण होत असुन त्या टाकीला एक छोटे छिद्र पडल्याने सदर सिलेंडर लिकेज झाल्याच्या आढळून आले, अग्निशमन दलाकडून श्वसन संयंत्राचा (ब्रिदिंग अप्राट्स सेटचा) उपयोग करून क्लोरीन सिलेंडरचे छिद्र बंद करून गळती नियंत्रीत करून सदर सिलेंडर जलतरण तलावाच्या पाण्यामध्ये सोडुन, त्यामधील गॅस पाण्यात वीरगळविणेत आली,

तत्पूर्वी क्लोरीन गॅस च्या गळतीमुळे जलतरण तलाव ठिकाणी कार्यरत असलेले 04 जीवरक्षक, 1 व्यवस्थपक, 1 सुरक्षा रक्षक, 1 तांत्रिक कर्मचारी यांनी नागरिकांना गॅस गळती मुळे बाधित झाल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले तसेच अग्निशमन नियंत्रण कक्षा मार्फत पोलीस नियंत्रण कक्षास माहिती दिली असल्याने सदर परिसर पोलिस प्रशासनामार्फत सुरक्षिततेच्या "कॉर्डन ऑफ" करण्यात आला,

pimpri chinchwad
Pune : बदलांसाठी सीओईपीचा नवा पॅटर्न; धोरणात्मक ब्लू प्रिंट तयार करणार - डॉ. प्रमोद चौधरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र व भोसरी अग्निशमन केंद्र येथील एकूण २९ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी कार्य केले असून घटनास्थळी त्वरेने मा. अति आयुक्त श्री प्रदीप जांभळे पाटील, मा सहा.आयुक्त (अग्नि) श्री विजयकुमार थोरात यांनी पाहणी केली, सदरील ऑपरेशन श्री ऋषिकांत चिपाडे अग्निशमन अधिकारी यांच्या नियंत्रणात पार पाडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com