पिंपरी-चिंचवडकरांसाठी महापालिका आयुक्तांनी केले महत्त्वाचे आवाहन; नव्या नियमावलीबाबत म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पिंपरी चिंचवडला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता. २२) सुरू झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेसबुक द्वारे शहरातील नागरिकांशी संवाद साधला. 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला राज्य सरकारने रेड झोनमधून वगळले आहे. काही प्रमाणात उद्योग सुरू झाले आहेत. दुकाने उघडली आहेत. म्हणजे कोरोना संपला, असे नाही. कोरोना गेलेला नाही, काही भागात तुरळक तर काही ठिकाणी अर्थात दाट लोकवस्ती, झोपडपट्टी अशा ठिकाणी तो जास्त प्रमाणात आहे. म्हणजेच कोरोना आपल्या सोबत आहे. आपण कोरोना सोबत जगत आहोत. याचं प्रत्येकाने भान ठेवून जगायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, तरच आपण, कोरोना विरुद्ध लढाईत जिंकू शकू, असा विश्वास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्येकाने कोरोना वॉरियर्स होऊ या, उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू होतील, घरात राहूनच रमजान ईदला नमाज पठण करा, हळूहळू शहर पूर्व पदावर येतंय, कंटेन्मेट झोनमधील नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यायला हवी, रिक्षा चालकांनी नियम पाळून कारवाई टाळावी, एका आसनावर एक प्रवासी, नो स्टॅंडिंग ट्रॅव्हलिंग तत्त्वावर पीएमपी सुरू होणार, असे सांगून आयुक्त हर्डीकर यांनी नागरिकांना दिलासा दिला. 

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार पिंपरी चिंचवडला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता. २२) सुरू झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेसबुक द्वारे शहरातील नागरिकांशी संवाद साधला. 

आयुक्त हर्डीकर म्हणाले...

- शहरातील काही व्यवसायिक दुकाने 50 टक्के तर काही शंभर टक्के उघडायला सुरुवात झाली आहे

- शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्था, क्लासेस बंद राहतील. 

- कोरोनाची लक्षणे दिसल्यास फ्लू क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्या

- परस्पर औषधे घेऊ नका.

- घरात थांबून प्रत्येकाला कंटाळा आलाय, तो घालवण्यासाठी एकट्याने करता येणारे व्यायाम करा. 

- दरवाजांच्या कड्या, टेबल, कम्प्यूटर, लिफ्ट व लाईट बटणे वारंवार निर्जंतुकीकरण करा

- आज आपण रेड झोन बाहेर असलो, तरी पुन्हा रेड झोन मध्ये जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. सुरक्षित रहा.

- बांधकामे हळूहळू सुरू होतील. तिथे काळजी घ्या

- आपल्याला प्रत्येकाचा जीव वाचवायचा आहे, हे लक्षात राहू द्या. त्यासाठी प्रत्येकाने कोरोना योद्धा होऊ या.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीबाबत 

कंटेन्मेंट झोन वगळून पीएमपी बस सेवा 26 मेपासून, परंतु पन्नास टक्केच प्रवासी असतील. एका आसनावर एक व्यक्ती. नो स्टॅंडिंग ट्रॅव्हलिंग असेल. रोख स्वरूपात तिकिट मिळणार नाही. दैनंदिन किंवा मासिक पास घ्यावा लागेल.

सार्वजनिक ठिकाणे

- हॉटेल्स, मॉल, सिनेमा गृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, सभागृह बंद. 

- 65 वर्षांवरील व दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती, दहा वर्षांखालील मुले आणि गरोदर स्त्रियांना प्रवास करण्यास मनाई असेल. 

- टॅक्‍सी, कॅब, रिक्षा, खासगी चारचाकी वाहन यातून चालक आणि दोन प्रवाशांनाच प्रवास करण्यास परवानगी असेल.

- दुचाकीवर एकच जण प्रवास करू शकेल. 

- धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, संमेलने बंद

- अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळेत संचारास बंदी

- सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे

- रेड झोनमधून येण्यासाठी कामगारांनी परवानगी घ्यावी

कंटेन्मेंट झोनबाबत

- कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातही मास्क वापरावे. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. येथील दुकाने सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हे आहेत कंटेन्मेंट झोन

शहरात सध्या खराळवाडी, शिवनेरी कॉलनी पिंपळे गुरव, रुपीनगर, गंधर्वनगरी मोशी व विजयनगर, पिंपळे सौदागर शुभश्री सोसायटी, साई पॅरेडाईज; फुगेवाडी; आकुर्डी शुभश्री परिसर; पिंपळे गुरव जगताप कॉम्प्लेक्‍स, शिवनेरी कॉलनी, विनायकनगर, कवडेनगर; भोसरी गुरुविहार सोसायटी, लांडगेनगर, हनुमान कॉलनी, हुतात्मा चौक, चक्रपाणी वसाहत; जुनी सांगवी मधुबन सोसायटी, पवनानगर; काळेवाडी; रहाटणी छत्रपती चौक, तांबे शाळा, तापकीर चौक, ज्ञानगंगा गृहनिर्माण सोसायटी; वाकड कस्पटे वस्ती; थेरगाव दत्तनगर; चिंचवड स्टेशन इंदरानगर, मोहननगर, आनंदनगर; किवळे विकासनगर; मोशी बनकर वस्ती, वुड्‌स विले; दिघी विजयनगर, अमृतधारा; चऱ्होली निकमवस्ती, साठेनगर; रुपीनगर पंचदुर्गा परिसर; तळवडे न्यू अँजल स्कूल; चिखली ताम्हाणे वस्ती, मोरेवस्ती; संभाजीनगर आंब्रेला गार्डन, बजाज स्कूल; पिंपरी भाटनगर. गणेशम् सोसायटी पिंपळे सौदागर, बालघरे वस्ती चिखली हे कंटेंन्मेंट झोन आहेत. येथील नागरिकांसाठी सध्या प्रमाणेच नियम लागू राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri chinchwad muncipal commissoner shravan hardikar communicate with citizens on facebook