पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आज पुन्हा मृतांचा आकडा चुकला 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

आज पुन्हा मृतांचा आकडा महापालिकेकडून चुकला.

पिंपरी : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येने आज (मंगळवारी) पन्नास हजारांचा आकडा पार केला. आज शहरात 966 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 50 हजार 296 झाली. आज 630 जणांना डिस्चार्ज मिळाला. आजपर्यंत 37 हजार 387 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 12 हजार 42 रुग्ण सक्रिय आहेत. दरम्यान, आज पुन्हा मृतांचा आकडा महापालिकेकडून चुकला.

पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांच्या तपासण्यांवर तपासण्या 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज दिवसभरात 13 जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. तसेच, शहरातील आठ व शहराबाहेरील पाच जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. आजपर्यंत शहरातील एकूण 867 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी चौदा जणांचा मृत्यू झाला. त्याच्या आदल्या दिवसाचा मृतांचा आकडा 862 होता. त्यात चौदा मिळविल्यास मृतांचा आकडा 876 व्हायला हवा होता. मात्र आठ नावे दुबार आल्याचे सांगत मृतांची संख्या 854 निश्चित करण्यात आल्याचे महापालिका अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी कळविले होते. 

दरम्यान, शहरातील एकूण मृतांची संख्या 866 झाल्याचे महापालिका प्रशासनाने काल कळविले होते. त्यात आजचे आठ समाविष्ट केल्यास एकूण मृतांची संख्या 874 व्हायला हवी होती. मात्र, महापालिकेने 867 कळविली आहे. सात दुबार नावे होती, ती वगळण्यात आल्याने एकूण मृतांची संख्या 867 असल्याचे डॉ. साळवे यांनी कळविले आहे. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज मयत झालेल्या व्यक्ती निगडी (पुरूष वय 59), भोसरी (पुरूष वय 81), पिंपळे गुरव (पुरूष वय 76), चिंचवड (पुरूष वय 45), मोशी (पुरूष वय 35), डुडुळगाव (पुरूष वय 63), सांगवी (पुरूष वय 70), राजगुरुनगर (पुरूष वय 68), खेड (पुरूष वय 75), रांजणगाव (पुरूष वय 57), देहूरोड (पुरूष वय 70), पिंपळे गुरव (स्त्री वय 63), आंबेगाव (स्त्री वय 53) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation again mistake to corona death figure