पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीतर्फे रविवारी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार शहरामध्ये आझादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सायक्लोथॉन स्पर्धा होणार
Cyclothon Competition
Cyclothon CompetitionSakal

पिंपरी - आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी लि. च्यावतीने आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेसाठी २ हजार ७७ स्पर्धकांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. रविवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता निगडी भक्ती- शक्ती येथून सायक्लोथॉन स्पर्धा सूरू होणार आहे, अशी माहिती बीआरटीएस विभागाचे शह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार शहरामध्ये आझादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सायक्लोथॉन स्पर्धा होणार असून महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्धेच्या ठिकाणाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता बापु गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, सायकल मेअर आशिक जैन आदी उपस्थित होते.

निगडी येथील रोटरी पुलाच्या अंडरपासमध्ये विद्यार्थ्यांनी थिम बेसीसवर वॉल पेंटींग पूर्ण केले आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी सुद्धा सहभाग घेतला. त्यांना वॉल पेंटींगद्वारे आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच, प्लेस मेकिंगचे काम पूर्णत्वावर आहे. हा परिसर अधिक स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Cyclothon Competition
पिंपरी : वायसीएमचे निवासी डॉक्टर्स संपावर, विविध मागण्यांसाठी आंदोलन

रविवारी होणा-या सायक्लोथॉन स्पर्धेचे स्वरुप राष्ट्रीयस्तराचे असून यामध्ये २०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा तीन प्रकारात घेण्यात येणार आहे. यात लहान मुले, सर्वसाधारण गट तसेच सराव करणा-या खेळाडूंसाठीचा गट तयार करण्यात आला आहे. ७ कि.मी., १५ कि.मी. आणि ७५ कि.मी. अंतराची ही स्पर्धा असणार आहे. स्पर्धेचे अंतर पूर्ण करणा-या खेळाडूंचा पदक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी महापालिका डॉक्टरांच्या पथकाची व्यवस्था स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आली आहे, असेही श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

७५ किमी. - सायक्लोथॉन साठी मार्ग -

भक्ती शक्ती चौक - निसर्ग दर्शन सोसायटी - पिंपरी चिंचवड इंजि.- कॉलेज इनरव्हिल चौक - धर्मराज चौक मार्गे - डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज - बास्केट ब्रिज चौक मुकाई चौक मुकाई चौकातुन डावीकडे मुंबई बेंगलोर पश्चिम बाह्यवळण मार्गे भुमकर चौक - भुमकर चौकातुन यु टर्न वाय जंक्शन देहुरोड - सोमाटणे फाटा टोलनाका सोमाटणे फाटा टोलनाक्या वरुन यु - टर्न वाय जंक्शन देहुरोड मुकाई चौकातुन - बास्केट ब्रिज रावेत ( संत तुकाराम महाराज पुल ) - डांगे चौक येथील उड्डाणपुलावरुन सांगवी फाटा येथील होरे पाटील अंडरपास मधुन यु-टर्न काळेवाडी फाटा - एम.एम.स्कुल चौक - एम्पायर इस्टेट उड्डाणपुल - इंडोलिक युरो सिटी कंपनी पासुन मा.आयुक्त बंगला - के.एस.बी चौक उड्डाणपुलावरुन कुदळवाडी स्पाईन रस्ता चौक - नाशिक रस्त्याकडे जय गणेश साम्राज्य चौकातुन यु-टर्न - साने चौकापासुन डाव्या हाताला वळुन थरमॅक्स चौक - उजवीकडे बळुन दुर्गानगर चौक - स्पाईन रस्ता - भक्ती - शक्ती चौक.

१५ किमी सायक्लोथॉन साठी मार्ग -

भक्ती शक्ती चौक - निसर्ग दर्शन सोसायटी - पिंपरी चिंचवड इंजि.- कॉलेज इनरव्हिल चौक - धर्मराज चौक मार्गे - डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज-किवळे बीआरटीएस टर्मिनल-पुन्हा भक्ती शक्ती.

७ किमी सायक्लोथॉन साठी मार्ग -

भक्ती शक्ती चौक - निसर्ग दर्शन सोसायटी-आकुर्डी स्टेशन-संभाजी चौक-पुन्हा भक्ती-शक्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com