पिंपरी-चिंचवड शहरात एक मार्चपासून पार्किंग पॉलिसी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी गेल्या वर्षी पार्किंग पॉलिसी आणली होती.

पिंपरी : शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी गेल्या वर्षी पार्किंग पॉलिसी आणली होती. मात्र, कोरोना व लॉकडाउनमुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. ती आता एक मार्चपासून केली जाणार आहे. शहराच्या विविध सहा भागांसाठी ही पार्किंग पॉलिसी असेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडकरांनो, कोणाला लिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर थांबा!

पार्किंगसाठी सहा भाग 

 • एक : निगडी- वाल्हेकरवाडी स्पाइन रस्ता, दापोडी ते निगडी पुणे-मुंबई जुना महामार्ग, निगडीतील टिळक चौक ते प्राधिकरणातील बिग इंडिया चौक, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी रेल्वे स्टेशन परिसर. 
 • दोन : चिंचवड ते वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड स्टेशन ते हिंजवडी रस्ता, काळेवाडी फाटा ते ऑटो क्‍लस्टर बीआरटी मार्ग 
 • तीन : केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट (ऑटो क्‍लस्टर) ते देहू-आळंदी रस्ता (चिखली), निगडी ते मोशी-भोसरी प्राधिकरण स्पाइन रस्ता. 
 • चार : थेरगाव गावठाण रस्ता, थेरगाव फाटा ते लिंक रस्ता, औंध- रावेत बीआरटी रस्ता. 
 • पाच : टेल्को रस्ता, नाशिक फाटा ते मोशी रस्ता 
 • सहा : निगडीतील भक्ती-शक्ती चौक. शहरातील सर्व उड्डाणपुलांखाली, नाट्यगृहे व शहरातील मोकळ्या जागा 

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक तासासाठी शुल्क 

 • दुचाकी, रिक्षा : 5 रुपये 
 • मोटारी, टेम्पो : 10 रुपये 
 • मिनीबस : 25 रुपये 
 • ट्रक, खासगी बस : 100 रुपये 
 • (एक रात्री व वर्षासाठीचे शुल्क निश्‍चित केले जाणार आहे.) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation to launch pay and park policy from 1 march