pcmc
pcmcsakal

PCMC News : मिळकत कर विभागातील गैरकारभाराबाबत तक्रारींची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल

मिळकत कर विभागातील गैरकारभारांची सविस्तर चार भागांची वृत्त मालिका ‘सकाळ’ मध्ये दिनांक १८ ते २१ डिसेंबर २०२२ दरम्यान प्रसिध्द झाली होती.
Summary

मिळकत कर विभागातील गैरकारभारांची सविस्तर चार भागांची वृत्त मालिका ‘सकाळ’ मध्ये दिनांक १८ ते २१ डिसेंबर २०२२ दरम्यान प्रसिध्द झाली होती.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकत कर विभागातील मूळ अभिलेख गायप करणे, चुकीची आकारणी आदि गैरकारभाराच्या नागरिकांच्या तक्रारींची व ‘सकाळ’ ने दिलेल्या वृत्त मालिकेची दखल विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना देण्यात आले आहेत.

मिळकत कर विभागातील गैरकारभारांची सविस्तर चार भागांची वृत्त मालिका ‘सकाळ’ मध्ये दिनांक १८ ते २१ डिसेंबर २०२२ दरम्यान प्रसिध्द झाली होती. तसेच; डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपसह २२ नागरिक, संस्था व संघटनांच्या लेखी व मेलवरील तक्रारींचीही विभागीय आयुक्त कार्यालयाने दखल घेत दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपने दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखी पत्र दिले होते. त्यांनंतर ‘सकाळ’ मधील वृत्तमालिकांमधील बातम्या दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी ई-मेलद्वारेही त्यांनी पाठविल्या होत्या. याबाबत डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना भेटून सविस्तर माहिती देवून चौकशी व कारवाईची मागणी केली.

महापालिका मिळकत कर विभाग इकिकडे कर न भरल्यास नागरिकांच्या टि. व्ही., फ्रिज आदि वस्तू जप्त करण्याचे इशारे देत आहे तर; दुसरीकडे याच विभागात भ्रष्टाचार व गैरकारभार होत आहे. परंतु; त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

दरम्यान, एका लिपीकाची बदली करुन पुन्हा त्याची बदली करु नका असा अहवाल दिल्या प्रकरणी महापालिका आयुक्त सिंह यांनी मिळकत कर विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांना नोटीस दिली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नागरिकांच्या तक्रारी गेल्यानंतर प्रशासकीय कार्यवाहीनुसार महापालिकेकडे त्या वर्ग केल्या जातात. त्यानुसार हे पत्र आले आहे. मिळकत कर विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांना मी वेगळ्या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

वरिष्ठांकडून बघ्याची भूमिका?

महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अनेक नियमबाह्य व बेकायदेशीर कामकाज समोर येवू लागले आहे. करसंकलन विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांवर एक लाख रुपये वसुलीसाठी घरांच्या जप्तीची कारवाई करत आहेत. मात्र, चिखलीतील एका बड्या उद्योजकांच्या मिळकतीचा सुमारे दीड कोटी रुपये कर माफ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सदरील मिळकतीच्या मूळ नस्ती, प्रस्ताव अधिकाऱ्यांनी गायब केला आहे. त्यामुळे करसंकलनचे अनेक अधिकारी ‘अर्थपुर्ण वाटाघाटी’ने पालिकेच्या तिजोरीला लुटून त्यातून स्वत:चे खिसे भरु लागल्याचे दिसत आहे. याकडे पालिका आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे कारवाई न करता बघ्याची भूमिका घेवू लागले आहेत, असेही कदम यांनी राव यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने नियमबाह्य कामकाज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडून शहरातील मिळकतीचे करयोग्यमुल्य निश्चित केले जाते. त्यानूसार निवासी आणि बिगरनिवासी अशी वर्गवारी करुन प्रति चौरस फूटावर करआकारणी करत तो वसूल केला जातो. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात १७ विभागीय कार्यालयाद्वारे कामकाज केले जाते. त्या विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने नियमबाह्य कामकाज करु लागले आहेत, असेही तक्रारीत नमूद आहे. अतिरिक्त आयुक्या प्रदीप जांभळे-पाटील यांनी कर संकलन विभागातील घोटाळ्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचे व दोषी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोटीस बजावऱ्याचे आदेश दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याबाबत सहायक आयुक्त निलेश देशमुख यांना विचारले असता, याबाबत आपणाला काही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com