Pimpri-Chinchwad : इंद्रायणी नदीत काळेपाणी, वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

पिंपरी-,चिंचवड महापालिका प्रशासनाकडून प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना गरजेच्या
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsakal

कुरुळी :  पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.  चिखली येथील ओड्यातून इंद्रायणी नदीमध्ये सध्या मैलामिश्रित सांडपाणी लाखो लिटर पाणी मिसळत असल्याने पाण्यातील जलचर आणि स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पीसीएमसी महापालिकेने या नदीत होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रसायन मिश्रित सांडपाणी पाणी असल्याने  त्याचे आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. रसायन मिश्रित पाणी असल्याने नदी काळ्या पाण्याची शिक्षा भोगते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

इंद्रायणी नदीवर आळंदी आणि देहू ही दोन महत्वाची तीर्थ क्षेत्र आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या उपस्थित संजीवनी समाधी सोहळा होणार असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक येथे येणार आहे. त्या सोहळ्याच्या आत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होणे गरजेचे आहे. इंद्रायणी नदी ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून हवेली आणि खेड तालुक्याची  जीवनदायनी म्हणून तिची ओळख आहे. मात्र इंद्रायणी नदी सध्या काळे पाणी असल्याने मोठे प्रदूषण वाढत आहे. परिसरातील एमआयडीसीतील कंपन्यांचे येणारे रसायनयुक्त पाणी नदीत मिश्रित होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

इंद्रायणीनदील लगतच्या दोन्ही बाजूच्या परिसरात मच्छरांचे डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

या परिसरातील गावातील शेती देखील धोक्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे या इंद्रायणी नदीमधील काळे प्रदूषित पाणी, परिसरातून येऊन मिळणारे सांडपाणी  याबाबत महापालिकेने उपाय योजना कराव्यात अशी मागणी ग्रामास्थांकडून जोर धरू लागली आहे.

अन्यथा वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात....

आळंदीत संजीवनी समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भाविक आळंदी येथे दाखल होतात. इतकेच नाही तर वारकरी आळंदी याठिकाणी आल्यावर हे पाणी देखील पितात. त्यामुळे या नदीच्या प्रदूषणावर तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या आजाराला वारकऱ्यांना सामोरे जावे लागेल.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे, मोईच्या सरपंच शिला रोकडे,निघोजेचे सरपंच रमेश गायकवाड ,वारकरी,ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com