बाप रे! पिंपरी-चिंचवड शहरात आज 70 हजारांचा आकडा पार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

आज रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. मात्र, बरे झालेल्या 953 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एक हजार 134 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांमध्ये 40 हजार 791 पुरुष, 25 हजार 80 महिला व तीन तृतीय पंथियांचा समावेश आहे. 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या सत्तर हजारांवर पोचली आहे. तर, 60 हजार 646 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या आठ हजार 51 रुग्ण सक्रिय आहेत. यात सहा हजार आठशे रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार 54 आहे. मात्र, त्यातील एक हजार दहा रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. 143 जण गंभीर असून 101 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

आज रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. मात्र, बरे झालेल्या 953 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एक हजार 134 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांमध्ये 40 हजार 791 पुरुष, 25 हजार 80 महिला व तीन तृतीय पंथियांचा समावेश आहे. 

आजपर्यंत बारा वर्षांखालील पाच हजार 580 मुलांना संसर्ग झाला आहे. 13 ते 21 वयोगटातील पाच हजार 916 युवक, 22 ते 39 वयोगटातील 28 हजार 14 तरुण, 40 ते 59 वयोगटातील 21 हजार 290 प्रौढ आणि साठ वर्षांवरील नऊ हजार 20 ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झालेला आहे. 

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना पाठवलं पत्र; अभ्यासकांनी केल्या 'या' मागण्या

पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाख 46 हजार 515 जणांचे अठ्ठावीस दिवसांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. सध्या 12 हजार 901 जण होम क्वारंटाइन आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pimpri-Chinchwad the number crossed 70000