पिंपरी-चिंचवड : दीड हजार ज्येष्ठांकडे एसटीचे ‘स्मार्ट कार्ड’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ‘डिजिटलायझेशन’ स्वीकारून दोन वर्षांपूर्वी ‘स्मार्ट कार्ड’ योजना अमलात आणली. गेल्या वर्षी कोरोनामुळे एसटीचा प्रवास काही महिने बंद होता. आता स्थिती पूर्ववत झाल्याने वल्लभनगर आगारातून पाच महिन्यांत तब्बल एक हजार ६०० ज्येष्ठांना ‘स्मार्ट कार्ड’ वितरित करण्यात आले.

पिंपरी - राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ‘डिजिटलायझेशन’ स्वीकारून दोन वर्षांपूर्वी ‘स्मार्ट कार्ड’ योजना अमलात आणली. गेल्या वर्षी कोरोनामुळे एसटीचा प्रवास काही महिने बंद होता. आता स्थिती पूर्ववत झाल्याने वल्लभनगर आगारातून पाच महिन्यांत तब्बल एक हजार ६०० ज्येष्ठांना ‘स्मार्ट कार्ड’ वितरित करण्यात आले. 

स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांकडून ५५ रुपये शुल्क आकारण्यात येते. ऑनलाइन नोंदणीनंतर त्यास आधार कार्डशी लिंक करण्यात येते. पंधरा दिवसात संबंधितांना ‘स्मार्ट कार्ड’ दिले जाते. नोंदणी करूनही लॉकडाउनमुळे कार्ड मिळाले नव्हते. आता ‘अनलॉक’मध्ये २० ऑगस्टपासून कार्ड वितरित केले जात आहेत. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान वा आधारकार्ड वागवण्यापासून सुटका झाली आहे. ‘स्मार्ट कार्ड’मुळे कोठे व किती किलोमीटर प्रवास केला, याची माहिती एका क्‍लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होत आहे. ज्येष्ठांना अर्ध्या तिकीट दरावर वर्षभरात चार हजार किलोमीटर प्रवासाची मर्यादा आहे, अशी माहिती वल्लभनगर आगारप्रमुख स्वाती बांद्रे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्मार्ट कार्डला रिचार्ज
स्मार्ट कार्डला रिचार्ज केल्यास प्रवासादरम्यान पैसे जवळ बाळगण्याची गरज नाही. सुरुवातीला तीनशे रुपये रिचार्ज करावे लागते. त्यानंतर शंभर ते पाच हजारांपर्यंत रिचार्ज उपलब्ध आहे. ‘स्मार्ट कार्ड’ डेबिट कार्डप्रमाणे वापरता येते. प्रवासभाडे रकमेत ५० टक्के सवलत मिळाल्याने एसटी बसद्वारे प्रवास करण्याकडे ज्येष्ठांचा कल वाढला आहे. 

दृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त 

नवीन नोंदणी सुरू
वल्लभनगर आगारात नवीन नोंदणीला सुरुवात झाली आहे. आधार आणि मतदारकार्ड पाहून स्मार्ट कार्डची आगारनिहाय नोंदणी केली जात आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही, त्यांच्याकडील मतदार व आधारकार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकिटांद्वारे प्रवास करू दिला जातो. पण, शासनाने भविष्यात स्मार्टकार्ड सर्वांना बंधनकारक केल्यास ही कागदपत्रे चालणार नाहीत.

पिंपरी-चिंचवड : पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

प्रवास हा ज्येष्ठ नागरिकांकरिता मोठ्या विरंगुळ्याचा भाग असतो. या प्रवासात अनेकांशी बोलणे होते. गप्पा होतात. अनेक जुन्या आठवणींना उजाळा देणारे प्रसंग अनुभवण्यास मिळतात आणि त्यातून मिळणारा आनंद ज्येष्ठ नागरिकांकरिता मोठा असतो.
- लक्ष्मण रूपनर, पासधारक, ज्येष्ठ नागरिक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Old People St Smart Card