Pimpri-Chinchwad: दिघीमध्ये सुरु केला बनावट नोटा बनवण्याचा कारखाना; इंजिनियरसह 6 जणांना अटक

Pimpri-Chinchwad counterfeit currency note racket बनावट नोटा प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा जणांना अटक केल्याचा दावा केला आहे.
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad

पिंपरी-चिंचवड- बनावट नोटा प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा जणांना अटक केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना ५०० रुपयांच्या मूल्याच्या ४४० नोटा आणि अपूर्ण छापलेल्या ४७८४ नोटा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रिटिंग मशिन, लॅपटॉप, पेपर कटिंग मशिन आणि प्रिटिंग पेपर जप्त केले आहेत. (Pimpri Chinchwad police claimed to have busted a counterfeit currency note racket with the arrest of six people)

सहा आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ह्रतिक खडसे (२२), सुरज यादव (४१), अकाश दंगेकर (२२), सुयोग साळूंके (३२), तेजस बल्लाल (१९) आणि प्रणव गव्हाणे (३०) यांना अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, खडसेकडे माहिती तंत्रज्ञान विषयातील डिप्लोमा आहे. त्याने मित्रांसोबत मिळून प्रिटिंग व्यवस्यास सुरु केला होता.

Pimpri-Chinchwad
Jodhpur Crime News: एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू! पत्नी-मुलांचे कालव्यात तर पतीचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पा बळवंत चौकातून आरोपींनी एक प्रिटिंग मशिन खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी दिघीमध्ये यूनिट उभारलं होतं. सुरुवातीला त्यांनी पॅम्लेट छापण्यास सुरुवात केली होती. पण, नंतर व्यवसाय होत नसल्याने त्यांनी वेगळा विचार सुरु केला. सुरज यादव हा ड्रायव्हर आहे. त्याने मित्रांना नोटा छापण्याची कल्पना दिली

Pimpri-Chinchwad
Nagpur Crime: 'तू तिला किती वेळा भेटलास?' असं म्हणत कॅफे मालकाला जबर मारहाण, आठ जणांकडून चाकूचा धाक दाखवत अपहरण

सुरज यादवला नोटांचे डिझाईन कसे करायचे हे माहिती होते. त्यांनी चायनिज ई-कॉमर्स साईटवरुन पेपर मागवले. त्यानंतर त्यांनी ५०० रुपयांच्या मूल्यांच्या १४० नोटा छापल्या. २०० नोटा ४० हजार रुपयांना देण्याची त्यांनी डील केली होती. सुरज यादव १४० नोटा विकण्यासाठी आला असताना पोलिसानी त्याला अटक केली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com