esakal | पिंपरी चिंचवडच्या गुन्हेगारांनो सावधान, आयर्नमॅन आलाय...
sakal

बोलून बातमी शोधा

krishna prakash.jpg

पिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (ता. 5) मावळते आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. 

पिंपरी चिंचवडच्या गुन्हेगारांनो सावधान, आयर्नमॅन आलाय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (ता. 5) मावळते आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. बुधवारी (ता. 2) रात्री उशिरा राज्यातील 45 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. ते पदभार कधी स्वीकारणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, शनिवारी (ता. 5) सकाळी ते आयुक्तालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मावळते आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून पदभार स्विकारला.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

कृष्ण प्रकाश यापूर्वी पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) पदावर कार्यरत होते. अतिशय खडतर समजली जाणारी फ्रान्समधील आयर्नमॅन ट्रायथलॉन ही स्पर्धा जिंकणारे पोलिस दलातील पहिले अधिकारी आहेत. पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील एकूण पंधरा पोलिस ठाण्यांचा समावेश करून 15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आले. आर. के. पद्मनाभन हे पहिले आयुक्त ठरले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची बदली झाल्यानंतर संदीप बिष्णोई यांची 20 सप्टेंबर 2019 ला आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. ते पिंपरी चिंचवडला येण्यापूर्वी मुंबई येथे वैधमापन शास्त्र नियंत्रक म्हणून कार्यरत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, बिष्णोई यांची बदली झाली असून त्यांच्या नव्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे आता कृष्ण प्रकाश हे शहराचे तिसरे आयुक्त ठरले आहेत.  त्यांनी फ्रान्समधील ट्रायथलॉन या स्पर्धेत चार किमी स्विमिंग, 186 किमी सायकलिंग आणि 42 किमी रनिंग असे तीन खेळ प्रकार केवळ 14 तासात पूर्ण करीत आयर्नमॅन हा किताब पटकाविला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासह सांगली जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून त्यांची 2008 ते 2010 या काळातील कारकीर्द वादळी ठरली. त्यांच्या काळात जिल्ह्यातील मटका, गुन्हेगारांवर मोठी जरब बसली. पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक स्थापन करून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांवर समांतर अशी देखरेख व्यवस्था निर्माण केली. तसेच त्यांनी आपल्या वक्तृत्वाने सागंलीकरांवर छाप पाडली होती. लोकांच्या तक्रारींची थेट लोकांत जाऊन दखल घ्यायचे. त्यांचे हे वर्तन अधिकारी म्हणून असलेल्या चौकटी मोडून काढणारे ठरले. त्याबद्दलही त्यांच्यावर सतत टीका व्हायची. 

loading image