

Pimpri Chinchwad Faces Ten Hour Power Cut After Substation Fire Disrupting Industrial Production Water Supply and Services
sakal
पिंपरी: चिंचवड येथील महावितरणच्या उपकेंद्रातील आगीमुळे सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांतील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. रविवारी तब्बल दहा तासांपेक्षा अधिक वीज नसल्याने पाणीपुरवठा, मोबाइल नेटवर्क यासह उद्योजकांना समस्या निर्माण झाल्या. उपनगरात याचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.