Pimpri-Chinchwad : ‘शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची तयारी करा’

सकाळ एनआयई’ आयोजित ‘शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना स्मिता क्षीरसागर.
pimpri chichwad
pimpri chichwad sakal

पिंपरी - ‘‘शालेय वयातच स्पर्धा परिक्षांची तयारी केल्यास त्याचा फायदा भविष्यात विद्यार्थ्यांना निश्चित होतो. त्यामुळे शालेय शिष्यवृत्ती परीक्षेकडे भविष्यातील स्पर्धा परिक्षांची तयारी म्हणून विद्यार्थ्यांनी पहावे,’’ असे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शिका स्मिता क्षीरसागर यांनी केले.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ या उपक्रमातंर्गत शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन चिंचवड येथील सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व श्री फत्तेचंद जैन विद्यालय येथे करण्यात आले होते.

pimpri chichwad
Mumbai: धारावी झाली चकाचक, महिनाभरात महापालिकेने हटवला ६०० टन कचरा

यावेळी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. विद्यालयाच्या प्राचार्या सारंगा भारती, उपमुख्याध्यापिका सुषमा बंब, पर्यवेक्षक दीपक थोरात, उज्वला कोळपकर, मनीषा लोखंडे, प्राचार्या सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी, राजेंद्र पितळीया, संजीव वाखारे, कल्पना गोरडे, स्मिता सोनवणे, नीलीमा कोठावदे उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाल्या, ‘‘शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करताना आपल्या अभ्यासात व सरावात सातत्य राहिले पाहिजे. वाचन, मनन, चिंतन या त्रिसूत्रीचा वापर केल्यास अभ्यास अधिक सोपा होतो. आपल्यातील दृढनिश्‍चयाने आपण स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करू शकतो, त्यासाठी चिकाटी व जिद्द विद्यार्थ्‍यांनी सोडू नये.’’ यावेळी त्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेतील इंग्रजी विषयांचे मुद्देसूद विस्तृत उदाहरणासह माहिती दिली. दैनंदिन अभ्यासासोबत शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करता येतो. त्यासाठी वाचन महत्वाचे आहे,

pimpri chichwad
Pimpri Chinchwad : पोलिस चौकीवर चढून दगडफेक, वैफल्यग्रस्त तरुणाचा दोन तास थरार

असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्याच्या विविध प्रश्‍नांची उत्तरे देत त्यांच्या शंकाचे निरसन केले. इंग्रजी भाषेची भीती न बाळगता हा विषय सुद्धा विद्यार्थी सहजपणे सोडवू शकतात, हा आत्मविश्‍वास या कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘सकाळ एनआयई’चे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी संयोजन केले.

pimpri chichwad
Pune News : पुनर्वसनाठी घेणार जागांचा शोध; पथारी व्यावसायिकांचे पुणे महापालिका करणार बायोमेट्रिक सर्वेक्षण

मार्गदर्शन लेख ‘सकाळ एनआयई’त‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘सकाळ एनआयई’ हा साप्ताहिक अंक दर शुक्रवारी प्रसिद्ध होत असून विविध माहितीपर सदरांसोबत पाचवी व आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय शिष्यवृत्ती परिक्षा अभ्याक्रमाची विषयानुरूप माहिती प्रसिद्ध केली जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यास सदरात विविध मान्यवर तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध होत असून, विद्यार्थी व पालकांनी या अंकाचे सभासदत्व घ्यावे, असे आवाहन ‘सकाळ ‘एनआयई़’च्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com