Pimpri chinchwad : शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिव भक्तांच्या टेम्पोला अपघात Pimpri chinchwad Shiva Jyot accident involving Shiva devotees | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Pimpri chinchwad : शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिव भक्तांच्या टेम्पोला अपघात

वाकड : शिवजयंतीनिमित्त मल्हारगडहून मावळ तालुक्यातील शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन येणा-या मावळ तालुक्यातील शिवभक्तांच्या टेम्पोला कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर ताथवडे येथील हॉटेल साई दरबार समोर ट्रकने मागून धडक दिली यात ३३ शिवभक्त जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींना सोमटनेतील पवना, पायोनीयर व रावेत येथील ओजस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. १०) पहाटे पाचच्या सुमारास घडला.

अपघातानंतर ट्रकचालकाला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी शिव भक्तांनी मुंबई-बंगळूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने रावेत ते बालेवाडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अखेर पोलिसांनी शिवभक्तांची समजूत काढत जखनींना रुग्णालयात रुग्णालयात हलवित शिवभक्तांना रस्त्यावरून बाजूला घेतल्याने आठच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. यापैकी २० जणांवर

सोमाटने येथील पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सध्या हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याने हिंजवडी पोलिस ठाण्याच्या आवारातही शिवभक्तांची गर्दी जमली आहे.

दक्ष भानुसघरे, ऋतिक कोंडभर, संस्कार कोंडभर, गणेश कोंडभर, वेदांत कोंडभर, अथर्व कोंडभर, विलास पोपट कोंडभर, यश कोंडभर, अभिषेक मोरे, सिध्दार्थ भानुसघरे, रोहन भानुसघरे, विरेन मोरे, सिद्धेश कोंडभर, साहिल पाटफोडे, करण कोंडभर, आदित्य सातकर, हर्ष धाम, गौरव भानुसघरे, तेजस कोंडभर, सौरभ कोंढभर ही या अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून यापैकी चार ते पाचजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. दहाच्या सुमारास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त मनोजकुमार लोहिया यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या शाळांत परीक्षा सुरू आहेत मात्र वाहतूक जाम असल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदारांचे सकाळी मोठे हाल झाले विद्यार्थ्यांना तर बस मधून उतरत पायी शाळा गाठावी लागली