Pimpri News : शालेय अभिलेखांच्या संगणकीकरणासाठी सॉफ्टवेअर

डुडुळगाव शाळेतील उपशिक्षकाकडून निर्मिती; एका क्लिकवर होणार माहिती उपलब्ध
Nitn Gode
Nitn Godesakal

पिंपरी - शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील अभिलेखांना महत्त्वाचे स्थान आहे. यासाठी शाळांमध्ये कागदपत्रांचा ढीग पाहायला मिळतो. पण, यावर डुडुळगाव शाळेतील उपशिक्षक नितीन भागा गोडे यांनी उतारा शोधला आहे.

त्यांनी शाळांमध्ये संगणक कौशल्याचा वापर करून शाळेतील अभिलेखांचे डीजिटायलाझेशन (संगणकीकरण) साठी सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व सॉफ्टवेअर ‘एका क्लिकवर’ विविध प्रकारचे अर्ज, पत्र, माहिती तत्काळ उपलब्ध करून देते.

शालेय अभिलेखे अथवा नोंद पत्रके यावरून शाळेची सद्यःस्थिती मुख्याध्यापकांना समजते. शैक्षणिक कार्याची माहिती मिळते. शालेय अभिलेख हे फाइल किंवा रजिस्टर्स स्वरूपात असतात. यामुळे कागदाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो.

शालेय कामकाजातील वेळेची बचत होऊन, सर्व माहितीमध्ये एकवाक्यता व सुसूत्रीतपणा यावी या उद्देशाने या सॉफ्टवेअरची निर्मिती केली गेली. यात प्रामुख्याने एकाच एक्सेल शीटमध्ये विद्यार्थ्यांची फोटोसहीत शंभरपेक्षा अधिक विविध मुद्यांची माहिती संकलित केली आहे. शालेय अर्ज, माहिती तयार करून त्यात फॉर्मुल्यांच्या विविध प्रकारांचा वापर करून सॉफ्टवेअर विकसित करून ते एका क्लिकवर उपलब्ध करण्यात आले.

कोणत्याही एका इयत्तेत भरलेली ही माहिती पुढील सर्व इयत्तांसाठी वापरता येऊ शकते. कोरोना काळ व त्यानंतरच्या शालेय वेळेव्यतिरिक्त वेळेत त्यांनी या शालेय सॉफ्टवेअर निर्मितीवर विशेष परिश्रम घेऊन ते पूर्णत्वास नेलेले आहे.

ही मिळते माहिती

शाळा, महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती असलेली फाइल, जसे की लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि ग्रेडची माहिती उपलब्ध असते. याद्वारे नवीन दाखल प्रवेश अर्ज, विद्यार्थी संपूर्ण माहिती, बोनाफाइड, दाखला मागणी पत्र, वार्षिक उपस्थिती तक्ता, संकलित विविध तेरीज पत्रके, विविध जाती-संवर्ग निहाय वर्गीकरण, आधारकार्ड माहिती व संख्या, डीबीटी बँक माहिती, रजिस्टर क्रमांक एक विद्यार्थी माहिती, प्रगती कार्ड माहिती, वाचनालय रेकॉर्ड, शैक्षणिक सहलीसंबंधीचे विविध अर्ज आदी सर्व माहिती व अर्ज हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फक्त एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.

आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

अध्यापनात विविध आधुनिक तंत्रे, साधने यांचा वापर व ऑनलाइन चाचणी, शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करून विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नुकताच झालेल्या शिक्षकदिनी महापालिका शिक्षण विभाग आयोजित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३’ देऊन गौरवण्यात आले.

सध्या मी शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी संचयिका नोंदपत्रके, संकलित मूल्यमापन पत्रके यावर काम सुरू केले असून, ते देखील पुढील काळात लवकरच उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न आहे. भविष्यात महापालिका शिक्षण विभाग प्रशासनाच्या मदतीने विविध शाळेतील अभिलेखांचे संगणकीकरणासाठी या सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

- नितीन गोडे, उपशिक्षक, महापालिका शाळा, डुडुळगाव

नितीन गोडे या शिक्षकांची सॉफ्टवेअर निर्मितीची चर्चा आहे. ते सॉफ्टवेअर उपयुक्त असेल, तर त्याचा उपयोग प्रत्येक शाळांमध्ये करण्यात येईल. शालेय विभागाच्या वापरण्यासाठीही विचार करण्यात येईल.

- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com