पिंपरी-चिंचवड स्थायी समितीने सुमारे शंभर कोटींच्या विषयांना दिली मंजुरी

PCMC
PCMC

पिंपरी - दिव्यांग कल्याणकारी योजना आणि वडमुखवाडी येथील संत भेट समूहशिल्पासाठी तरतूद वर्गीकरणासह 85 विषयांना बुधवारी महापालिका स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. यात सुमारे शंभर कोटी 40 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे होते. त्यात अवलोकनाचे नऊ, मान्यतेचे 48 विषय होते. ऐनवेळी वर्गीकरणाचे 11 कोटी 34 लाखांचे पाच विषय आणि प्रशासनाचे 13 विषय मंजूर केले. यात दिव्यांगांना पीएमपी बसमध्ये प्रमाणपत्राशिवाय पास द्यावा, महापालिकेच्या आठ रुग्णालयांतील 50 टक्के बेड कोविड व्यतिरिक्त अन्य आजारांसाठी उपलब्ध करणे आणि पीएमपीसाठी कायमस्वरुपी राजकीय प्रतिनिधी संचालकपदी नियुक्त करावा अशा विषयांचा समावेश होता. कोविडसाठी वेगवेगळ्या लेखाशीर्ष वर्गीकरणाचा विषय मागे घेतला. तर याच काळात तातडीची खरेदीचा पाच कोटींचा विषय आणि मगर स्टेडियम जम्बो रुग्णालयासाठी 45 लाख रुपयांचे कापड खरेदीचा विषय तहकूब करण्यात आला. 

- जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची टाकी दुरुस्ती : तीन कोटी 60 लाख 
- महापालिका संकेतस्थळ देखभाल-दुरुस्ती : 47 लाख 
- विद्युत दिवे खरेदीसाठी करारनामा करणे : 19 लाख 
- अग्निशामक विभागास साहित्य पुरविणे : 15 लाख 
- महापालिकेत प्रिंटर खरेदी : 18 लाख 
- आयटी विभागार संगणक प्रणाली दुरुस्ती : 8 लाख 
- कोविड केअर सेंटरसाठी स्टेशनरी खरेदी : 15 लाख 

आर्थिक मान्यतेचे विषय 
- वायसीएमसाठी 17 व्हेंटीलेटर खरेदी : दोन कोटी 63 लाख 
- पीएमपीला बस खरेदी व पासपोटी संचलन तूट : 133 कोटी 58 लाख 
- विविध आठ रस्ते व दुभाजक सुशोभिकरण : तीन कोटी 99 लाख 
- विविध सात उद्याने देखभाल- दुरुस्ती : तीन कोटी 62 लाख 
- महापालिका नर्सरीसाठी माळी व मजूर पुरविणे : 25 लाख 
- सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर सौरउर्जा यंत्रणा बसविणे : 57 लाख 
- विविध कामांच्या व्हिडीओ शुटिंग करणे : 29 लाख 
- पवनातून जादा पाणी घेण्यापोटी सिंचन विभागाला अनामत : 37 लाख 
- पवना नदीवर गहुंजे व शिवणेत बंधारा बाधण्याचे संकल्पचित्र : 36 लाख 
- महापालिका संगणक यंत्रणा देखभालीसाठी करारनामा : एक कोटी 18 लाख 
- जलशुद्धीकरण केंद्रावर कंत्राटी कामगार नेमणे : 91 लाख 
- जलशुद्धीकरण केंद्रावर विविध कामे करणे : एक कोटी 23 लाख 
- कोविड सेंटरसाठी बेड व लॉकर खरेदी : 58 लाख 
- सांडपाणी वाहिन्या देखभाल, दुरुस्ती, सफाई : तीन कोटी 88 लाख 
- प्रभाग 18 डीपी रस्ता करणे : 2 कोटी 98 लाख 
- पशुवैद्यकीय विभाग श्‍वान संततीनियमन शस्त्रक्रिया : 35 लाख 
- वायसीएम रुबी अलकेअर अधिकारी, कर्मचारी वेतन : एक कोटी 42 लाख 
- मैलापाणी प्रक्रिया केंद्रासाठी : एक कोटी 28 लाख 

इतर मान्यतेचे काम 
- मेट्रोला 23 हजार 619 चौरस फूट जागा भाडेतत्त्वार देणे 
- स्वच्छ मोहिमेत पाईव्ह स्टार मानांकासाठी कचरा मुक्त शहर 
- विद्युत विषयक कामांसाठी ठेकेदाराशी करार करणे 
- रस्ते व पावसाळी वाहिन्यांसाठी सल्लागार नियुक्त करणे 
- ऑटो क्‍लस्टर कोविड सेंटरला एक्‍स-रे सुविधा पुरविणे 
- दिघी शाळा इमारत आरक्षण कार्यवाहीसाठी सल्लागार नियुक्ती 
- वायसीएममध्ये 128 नर्स नियुक्ती करणे 
- शाळांमधील पाण्याच्या टाक्‍यांची साफसफाई करणे 
- पिंपरी वाघेरे भाजी मंडई आरक्षण मोजमाप करणे 
- मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीचा प्रवास खर्च 
- सारथी हेल्पलाइन दहा ऑपरेटर नियुक्त करणे 
- विविध विकास कामे सुसुत्रतेसाठी सल्लागार नियुक्त करणे 
- कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सोपस्कारासाठी 20 कर्मचारी नियुक्त 

तरतूद वर्गीकरण 
- दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी : 12 कोटी 87 लाख 
- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनांतर्गत महापालिाक सोसायटीसाठी : 11 लाख 
- वडमुखवाडी समूहशिल्पासह प्रभाग तीनमधील कामांसाठी : 9 कोटी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com