टेस्टिंग कमी नव्हे, संसर्ग नियंत्रणात; पिंपरी-चिंचवडची स्थिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

‘टेस्टिंग कमी होत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसत आहे, अशी चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वसामान्यांसह सोशल मीडियावरही होत आहे. मात्र, ‘पूर्वीप्रमाणेच टेस्टिंग होत आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १४ व्यक्ती तपासल्या जात आहेत. संसर्ग कमी झाल्याने रुग्ण कमी झाले आहेत, त्यामुळे टेस्टिंगचे प्रमाणही कमी झाले आहे. पण, कोरोना अद्याप संपलेला नाही. सर्वांनी काळजी घ्यायला हवी,’’ असे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

पिंपरी - ‘टेस्टिंग कमी होत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसत आहे, अशी चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वसामान्यांसह सोशल मीडियावरही होत आहे. मात्र, ‘पूर्वीप्रमाणेच टेस्टिंग होत आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १४ व्यक्ती तपासल्या जात आहेत. संसर्ग कमी झाल्याने रुग्ण कमी झाले आहेत, त्यामुळे टेस्टिंगचे प्रमाणही कमी झाले आहे. पण, कोरोना अद्याप संपलेला नाही. सर्वांनी काळजी घ्यायला हवी,’’ असे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यापूर्वी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत दररोज दीड हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. मृतांची संख्याही दिवसाला ५० पर्यंत पोचली होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने दोन जम्बो कोविड रुग्णालये सुरू केले आहेत. १९ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने केवळ सात कोविड सेंटर सुरू आहेत. बुधवारी (ता. २१) दुपारी चार वाजेपर्यंत केवळ दोन हजार दोनशे सक्रिय रुग्ण होते. महापालिकेच्या वायसीएम, जिजामाता, भोसरी, तालेरा, मगर स्टेडियम व ऑटोक्‍लस्टर जम्बो रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील रुग्ण संख्याही कमी झाली आहे. 

हॅलो! कसे आहात? काळजी घ्या

भ्रमात राहू नका
आमच्या मित्राला कोरोना झाला होता. दीड महिने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. व्हेंटिलेटर लावलेले होते. प्रकृती सुधारणा झाली होती. म्हणून डिस्चार्ज घेऊन घरी गेले होते. पण, पुन्हा त्रास होऊ लागल्याने आठ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झाले. आज त्यांचा मृत्यू झाला. कोरोनातून बरा झाल्यानंतरही काळाने घाला घातला, असे सांगताना कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या काळेवाडीतील व्यक्तीचे डोळे पाणावले होते. त्यांचे दुसरे मित्र म्हणाले, ‘‘कोरोना संपला किंवा कमी झाला अशा भ्रमात कोणीही राहू नये. कोरोनातून बरे झाल्यावर सर्वांनीच अधिक काळजी घ्यायला हवी. डॉक्‍टरांकडून नियमित तपासण्या करून घ्याव्यात.’

रिक्षाचालकांनो, .....तर तुमच्यावर होऊ शकते कडक कारवाई!

सध्या संसर्ग कमी झालेला आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १४ जण आपण तपासतो आहोत. शिवाय, ‘माझे घर, माझे कुटुंब’ मोहिमेअंतर्गत घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. लक्षणे आढळलेल्यांचे स्वॅब घेऊन तपासणी केली जात आहे. रुग्ण कमी झालेले असले, तरी सण, उत्सव व हवामान बदलाच्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे या नियमांचे पालन करावे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad status in infection control not less than testing