esakal | पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्या अध्यक्षांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC-Subject-Committee

महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला- क्रीडा- साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड शुक्रवारी बिनविरोध जाहीर झाली. अनुक्रमे स्वीनल म्हेत्रे, चंदा लोखंडे, प्रा. सोनाली गव्हाणे, उत्तम केंदळे आणि मनिषा पवार यांच्या हाती समित्यांची सुत्रे आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्या अध्यक्षांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला- क्रीडा- साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण या विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड शुक्रवारी बिनविरोध जाहीर झाली. अनुक्रमे स्वीनल म्हेत्रे, चंदा लोखंडे, प्रा. सोनाली गव्हाणे, उत्तम केंदळे आणि मनिषा पवार यांच्या हाती समित्यांची सुत्रे आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात त्या-त्या समित्यांची विशेष सभा झाली. पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून महिला व बालकल्याण आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद पिठासीन अधिकारी होते. निवडणुकीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपायुक्त अजय चारठणकर, संदीप खोत, मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त सुनिल अलमलेकर, अण्णा बोदडे, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप यांनी सर्व सभांचे कामकाज पाहिले. नवनिर्वाचित विषय समिती सभापतींचे महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी अभिनंदन केले.

पिंपरी चिंचवड पोलिस दलात कोरोनाचा तिसरा बळी

महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे प्रत्येक विषय समितीच्या नऊ सदस्यांमध्येही त्यांचेच प्राबल्य आहे. प्रत्येक विषय समितीत भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन व शिवसेनेचा एक सदस्य आहे. त्यामुळे भाजपचेच अध्यक्ष निवडून येतील हे उघड सत्य होते. त्यामुळे राष्ट्रवादी अथवा शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विषय समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी (ता. 19) दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. दिलेल्या मुदतीत केवळ भाजपच्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे सोमवारीच स्पष्ट झाले होते. शुक्रवारी फक्त निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

Edited By - Prashant Patil