esakal | पिंपरीत रविवारी ६२ केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

पिंपरीत रविवारी ६२ केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील ६२ केंद्रांवर रविवारी (ता.१२) ‘कोव्हिशिल्ड’, तर ८ लसीकरण केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ लशीचे डोस मिळणार आहे. कोव्हिशिल्ड’चे २२ हजार ६०० डोस उपलब्ध झाले आहेत. या लसीकरण केंद्रांवर सर्व लाभार्थ्यांची लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (ता.१२) सकाळी ८ वाजता स्लॉट बुकिंग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस लाभार्थ्यांना आठ या प्रभागवार पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.

एकूण २२ हजार ६०० डोसपैकी पहिला व दुसरा डोस हा पालिकेच्या केंद्रीय किओक्स (KIOSK) टोकन प्रणालीव्दारे ६ हजार २२० इतके कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ३१० इतके डोस व उर्वरित १६ हजार ७० इतके डोस हे ‘ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन’ कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील किओक्स मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.

हेही वाचा: भोंदू मनोहर मामा म्हणतो; 'आता मला जेलमध्येच मरु द्या!'

या प्रभागवार पद्धतीने लाभार्थ्यांना ३ हजार २०० ‘कोव्हॅक्सिन’ लशीचा डोस ८ लसीकरण केंद्रांवर देण्यात येणार आहे. एकूण ३२०० पैकी आठशे कोविड डोस पहिल्या डोससाठी राखीव असून त्यातील केंद्रीय किओक्स टोकनप्रणाली व्दारे १६० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ४० डोसेस व उर्वरित ६०० डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. उर्वरित २४०० डोसेस दुसऱ्या डोससाठी राखीव असून त्यातील पालिकेच्या केंद्रीय किओक्स टोकनप्रणालीव्दारे १६० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ४० डोसेस व उर्वरित २२०० डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील किओक्स मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.

ज्या नागरिकांची‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे. त्यांनी वॉर्डनिहाय केंद्रीय किओक्स टोकनप्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. त्यांना ‍पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ‘ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप’ पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.

हेही वाचा: दिल्लीतून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटला उडवण्याची मिळाली सनसनाटी धमकी

महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी महापालिका वॉर्डनिहाय केंद्रीय किओक्स टोकनप्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी आठ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.

loading image
go to top