
Pimpri Chinchwad Traffic
Sakal
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी आणि महापालिका शाळांसमोर गतिरोधक नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मुख्य रस्ता ओलांडून जावे लागते. यामुळे त्यांची सुरक्षा वाहनांच्या गर्दीमुळे धोक्यात आली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे, अशा शाळा अपघातप्रवण स्थळ बनल्या असल्याचे चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे.