pimpri chinchwad : दोन हजार विद्यार्थ्यांनी घेतल्या लशीच्या दोन मात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad : दोन हजार विद्यार्थ्यांनी घेतल्या लशीच्या दोन मात्रा

Pimpri Chinchwad : दोन हजार विद्यार्थ्यांनी घेतल्या लशीच्या दोन मात्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मदतीने महाविद्यालयांमध्ये लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य’ हाती घेण्यात आले आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसात केवळ १८ महाविद्यालयातील २ हजार ५८ विद्यार्थ्यांनी डोस पूर्ण केला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण बाकी असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयातील उपस्थितीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: अनारक्षित पँसेजर गाड्या उद्यापासून रूळावर! प्रवाशांना दिलासा

कोरोनाच्या दीर्घ सावटानंतर २० ऑक्टोबरला शहरातील वरीष्ठ महाविद्यालये सुरू झाली. पण कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरलेली असली तरी देखील अद्यापही नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ४० लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण या मोहिमेत पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ उच्च शिक्षण विभागाचे होते. त्यासाठी त्यांच्याकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी विविध विद्यापीठे , स्वायत्त संस्था, खासगी विद्यापीठे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ ते २५ वर्षे वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची मोहीम ‘मिशन युवा स्वास्थ्य’ अंतर्गत २५ ऑक्टोबरपासून सुरू केली. पण या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: NZ vs AUS : फायनलपूर्वी समोर आले नीशमच्या व्हायरल फोटोमागचं सत्य

या अंतर्गत १ हजार १२४ विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला. तर ९३४ विद्यार्थ्यांनी दुसरा डोस पूर्ण केल्याचे माहिती उपलब्ध आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा दिवाळीनंतर लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. कारण लस घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या कोणत्याही महाविद्यालयांमध्ये जाऊन लस घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवास करून आपल्या महाविद्यालयांत जाण्याची गरज नसल्याचे उच्च शिक्षण विभागाकडून सूचना दिल्या आहेत.

दिवाळी सुट्टीनंतर लशीच्या दोन्ही मात्रा

१८ वर्षे पूर्ण केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असूनही महाविद्यालय सुरू नसल्याने त्यांना घरीच राहावे लागत होते. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना डोस घेणे आवश्‍यक असल्याचे दिसून येत आहे.

आकडे बोलतात

डोस घेतलेले महाविद्यालय - पहिला डोस - दुसरा डोस

१८ - ११२४ -९३४

एकूण - २०५८

loading image
go to top