अनारक्षित पँसेजर उद्यापासून रूळावर! मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा | Manmad Railway | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manmad

अनारक्षित पँसेजर गाड्या उद्यापासून रूळावर! प्रवाशांना दिलासा

sakal_logo
By
अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : कोरोनामुळे गेल्या २० महिन्यांपासून बंद असलेल्या अनारक्षित पॅसेंजर गाड्या रेल्वे बोर्डाच्या सुचनेनुसार टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार उद्या(ता. १५) पासून पुणे - मनमाड - औरंगाबाद - जालना - परभणी - निजामाबाद ही अनारक्षित पॅसेंजर गाडी (नं. ०१४०९ व ०१४१०) सुरू होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कोरोना संसर्ग वाढत असताना रेल्वेने सर्वच प्रवासी गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या कोरोना आटोक्यात असल्याने विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशी गाड्या सुरू करण्याची मागणी होत असताना आता पॅसेंजर गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे घेत आहे. त्यानुसार पुणे - सोलापूर - कुर्डूवाडी - कोल्हापूर आदी ठिकाणच्या प्रमुख पॅसेंजर गाड्याही सुरू होत आहेत. त्यामुळे आता भुसावळ विभागातील बहुप्रतिक्षित असलेली मनमाड - इगतपुरी शटल, भुसावळ - मुंबई पॅसेंजर, भुसावळ - पुणे तसेच, मनमाड - कुर्ला गोदावरी या गाड्या सुरू होण्याचा मार्ग येत्या काही दिवसांत मोकळा झाला आहे.


२० महिन्यांपासून बंद असलेले सर्वसाधारण तिकीटही आता या गाड्यांसाठी दिले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या गाड्या सुरू करतानाच कोविडचे सर्व नियम तसेच, रेल्वे पाससाठी कोविडचे दोन डोस व त्यानंतर १४ दिवस, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनचा अवलंबही सक्तीचा केला जाणार आहे. यामुळे अनारक्षित तिकीटाबरोबरच मुंबई लोकलच्या धर्तीवर मासिक पासचेही वितरणही काही दिवसातच सुरू होणार आहे. पंचवटीसाठी सध्या बंद असलेली पास बोगीही लवकरच जोडली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या विश्‍वसनीय सुत्रांनी दिली. दौंड - निजामाबाद एमएसपीसी स्पेशल १० डबे असलेली डेमू अनारक्षित ट्रेन येत्या आज (ता. १५) पासून सुरू होत आहे. दौंडहून सायंकाळी ४.४५ ला निघणारी ही गाडी येवल्याला रात्री ९ ला, तर मनमाडला रात्री १०.४५ ला, औरंगाबादला दुसऱ्‍या दिवशी पहाटे १२.४५, जालना २.१३, परभणी ४.३८, नांदेडला ५.५८ ला तर निजामाबादला सकाळी १०.४० ला पोहचेल.

हेही वाचा: नाशिक : उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार

सतर्क राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

अनेक महिन्यांपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. तर रेल्वेचेही उत्पन्न बुडत होते. त्यामुळे आता सर्वच विभागाला रेल्वे बोर्डाने आपापल्या भागात सध्याची कोविडची परिस्थिती व कोणत्या गाड्या सुरू करता येणे शक्य आहेत, त्याची माहिती तातडीने मागविली आहे. तसेच, याबाबत अ‍ॅलर्ट राहण्याच्या सूचनाही विभागातील संबंधित अधिकाऱ्‍यांना देण्यात आल्या आहेत.

रेल्वे बोर्डाकडे सकारात्मक प्रस्ताव

भुसावळ विभागातूनही दीड वर्षापासून बंद असलेली उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची जीवनवाहिनी मनमाड - नाशिक कुर्ला गोदावरी, भुसावळ - मुंबई पॅसेंजर, भुसावळ - देवळाली व मनमाड - इगतपुरी शटल या गाड्या सुरू करण्याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव ट्रॅफिक विभागाने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

हेही वाचा: पांढरे सोने आठ हजारी पार! दर वाढले पण, एकरी उत्पादनात घट

loading image
go to top