
एकावर कोयत्याने, हल्ला, तलवारीने वार, पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक, पिस्तुलातून गोळी झाडून खून अशा घटना वारंवार आयुक्तालयाच्या हद्दीत घडत आहेत.
पिंपरी - एकावर कोयत्याने, हल्ला, तलवारीने वार, पिस्तूल (Pistol) बाळगल्याप्रकरणी अटक, पिस्तुलातून गोळी झाडून खून (Murder) अशा घटना वारंवार आयुक्तालयाच्या हद्दीत घडत आहेत. हत्यारे सहज उपलब्ध होत असल्याने गुन्ह्यात अशा हत्यारांचा (Assassin) वापर वाढत असल्याचे दिसून येते. दरम्यान, हत्यारे बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी (Police) वेळीच मुसक्या आवळण्यासह ही हत्यारे येतात कुठून याचा शोध घेत ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध पोलिस ठाण्यात दरदिवशी मारहाण, प्राणघातक हल्ला, धाक दाखवून लुटणे अशा चार ते पाच घटनांची नोंद होत आहे. पाच पैकी साधारण तीन घटनेत कोयता, तलवार, पिस्तूल अशा घातक हत्यारांचा वापर झाल्याचे समोर येते. यातून गंभीर गुन्हे घडतात. परिसरात दहशत माजवली जाते. कोयता, तलवार सहज उपलब्ध होत असल्याने बहुतांश गुन्ह्यात या हत्यारांचा वापर केला जातो.
दरम्यान, एखाद्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली, टोळी पकडली अथवा सण, उत्सव तसेच महत्त्वाच्या दिवशी कोम्बिंग ऑपरेशन राबविल्यास मोठ्या प्रमाणात हत्यारे सापडतात. मात्र, इतर वेळीही अशा प्रकारची कार्यवाही झाल्यास गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होऊ शकते.
दीड महिन्यापूर्वी शेल पिंपळगाव, पिंपळे गुरव येथील खुनाच्या घटनेत तर कोये येथे पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात गुन्हेगारांनी पिस्तुलाचा वापर केला. तसेच पिस्तूल, कोयता, तलवार बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्याच्याही अनेक कारवाया आयुक्तालयाच्या हद्दीत झाल्या आहेत. दरम्यान, वाढत्या घटना लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्तांनी शस्त्र विरोधी पथक स्थापन केले आहे.
आयुक्तालयात काही दिवसांपूर्वीच शस्त्र विरोधी पथक स्थापन केले आहे. एक-दोन दिवसात स्टाफ उपलब्ध होणार असून, लवकरच कार्यालयही मिळेल. आम्ही काम सुरू केले आहे. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
- राजेंद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक शस्त्र विरोधी पथक प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.