Pimpri News : टेम्पोखाली सापडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri News : टेम्पोखाली सापडून तरुणाचा मृत्यू

Pimpri News : टेम्पोखाली सापडून तरुणाचा मृत्यू

पिंपरी : वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या मोटारीच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीची धडक बसली. दुचाकीवरील सहप्रवासी तरुण खाली पडला व विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली सापडला. त्यामुळे टेम्पोखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात दिघीतील आळंदी रोड येथे घडला.

हेही वाचा: 'हा हिंदू धर्म आहे का?'; खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, केली जाळपोळ

राम बाळासाहेब बागल (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी किशोर राजेंद्र बागल (रा. दिघी), सुरज जगन्नाथ घुले (वय २६, रा. बोपखेल), सुमित कालिदास परांडे (वय २८, रा. दिघी गावठाण), टेम्पो चालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मृत राम व आरोपी किशोर हे चुलत भाऊ असून ते गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. किशोर दुचाकी चालवत होता. दरम्यान, रस्त्यात विरुद्ध दिशेला सुरज व सुमित यांनी त्यांची मोटार पार्क केली होती. त्यांनी मोटारीचा डाव्या बाजूचा दरवाजा उघडला असता दुचाकीची दरवाजाला धडक बसली.

हेही वाचा: CMO आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा कोरोनाचा शिरकाव!

या धडकेत दुचाकीवर मागच्या सीटवर बसलेला राम खाली पडला. त्यावेळी विरुद्ध दिशेने एक टेम्पो येत होता. त्या टेम्पोखाली राम सापडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top