पिंपरी : ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’ची लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

पिंपरी : ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’ची लस

पिंपरी ः शहरातील १८ वर्षांपुढील नागरिकांना रविवारी (ता.१४) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’

प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, कै. शिवाजी भोईर सांस्कृतिक सभागृह केशवनगर चिंचवड, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा काळेवाडी, महापालिका शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्रायमरी स्कूल, पुनावळे, सेक्टर नंबर २९आठवडी बाजार शेजारी रावेत, ताथवडे जिल्हा परिषद शाळा या केंद्रांवर कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेले ५० टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने ५० टक्के लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण होणार आहे.

हेही वाचा: ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब

‘या’ ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’ चा डोस

ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या ८ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांसाठी लस

जुने भोसरी रुग्णालय, कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

loading image
go to top