esakal | पिंपरी: तोतया पोलिस उपनिरीक्षकाला सांगवी पोलीसांनी केली अटक
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी: तोतया पोलिस उपनिरीक्षकाला सांगवी पोलीसांनी केली अटक

पिंपरी: तोतया पोलिस उपनिरीक्षकाला सांगवी पोलीसांनी केली अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी: पोलिस दलात दाखल होऊन खाकी वर्दी अंगावर चढविण्याची आवड असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) अभ्यास सुरु केला. मात्र, एमपीएससीची परीक्षा देण्यापूर्वीच खाकी वर्दी अंगावर चढवून तोतयेगिरी सुरु केली. नागरिकांना कारवाईची धमकी देत सर्वत्र मिरविणाऱ्या या तोतया पोलिस उपनिरीकासह आणखी एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सांगवीतील सृष्टी चौक येथे करण्यात आली.

हेही वाचा: पिंपरीत रविवारी लसीचा दुसरा डोस मिळणार ‘ऑन द स्पॉट’

बुद्धभूषण अशोक कांबळे (वय २७, रा. म्हेत्रे वस्ती, टॉवरलाइन, निगडी) व औदुंबर भारत जाधव (वय २९, रा. स्मशानभूमीजवळ, कासारवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक प्रमोद गोडे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे सांगवी परिसरात मंगळवारी (ता. ३१) रात्री साडेनऊच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सृष्टी चौकातील एका पान टपरीवर दोघेजण संशयितरीत्या थांबल्याचे निदर्शनास आले. त्यातील एकाने आपण पोलिस उपनिरीक्षक असल्याचे, तर दुसऱ्याने एसबीआय बँकेत क्रेडिट मॅनेजर असल्याचे सांगितले.

हेही वाचा: बजाज फाउंडेशन करणार शहरातील भटक्या श्‍वानाचे मोफत निर्बिजीकरण

मात्र, त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यावर दोघेही तोतया असल्याचे समोर आले. एकाने पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासविण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान केला होता, तर दुसऱ्याने एसबीआय बँकेचा ड्रेस कोड परिधान केला होता. दोघे आरोपी सार्वजनिक ठिकाणी जाऊन दुकानदारांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागत होते.

दरम्यान, कांबळे याला पोलीस दलात दाखल होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचं आवड होती. यासाठी तो एमपीएसी परीक्षेचा अभ्यासही करायचा. मात्र, परीक्षेपूर्वीच त्याने खाकी वर्दी अंगावर चढवली. पुण्यातील एका टेलरकडून गणवेश शिवून घेतला. गणवेश परिधान करून नागरिकांना कारवाईची धमकी द्यायचा. अखेर कांबळे व त्याच्या साथीदार पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

असा आला संशय

या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. कांबळे याने आपण डीसीपी (उपायुक्त) असल्याचे सांगितले. मात्र, त्याने परिधान केलेला गणवेश उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा असल्याने तो तोतया असल्याचे स्पष्ट झाले.

loading image
go to top