Election
Election Esakal

पिंपरी : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मावळात ४३ अर्ज दाखल

१५ ग्रामपंचायतीच्या १९ जागांसाठी येत्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या १९ जागांसाठी येत्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी करण्यात आलेल्या छाननीत सर्व अर्ज वैध ठरल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. दरम्यान, उधेवाडी व करूंज येथील अनुसूचित जमाती तसेच जांबवडे येथील प्रभाग दोनमधील सर्वसाधारण जागेसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने या जागा पुन्हा रिक्त राहिल्या आहेत.
पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता तर मंगळवारी या अर्जांची छाननी करण्यात आली.

दाखल व छाननीत वैध ठरलेल्या गावनिहाय अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे- मळवंडी ठुले (सर्वसाधारण महिला) ४, धामणे (अनुसूचित जाती महिला) ३, नाणोलीतर्फे चाकण (सर्वसाधारण महिला) १, उधेवाडी (अनुसूचित जमाती) रिक्त, केवरे (सर्वसाधारण) ३, औंढे खुर्द (अनुसूचित जमाती) १, गोडूंब्रे (सर्वसाधारण महिला) ४, टाकवे खुर्द ( सर्वसाधारण ) १, आंबी ( सर्वसाधारण महिला ) ५, करूंज (अनुसूचित जमाती) रिक्त, नवलाख उंब्रे (सर्वसाधारण स्त्री) ३, बेबडओहळ (सर्वसाधारण) ४ व (अनुसूचित जाती) २, साळूंब्रे ( सर्वसाधारण महिला प्रभाग २ ) ३, ( सर्वसाधारण महिला प्रभाग ३ ) ३, जांबवडे ( सर्वसाधारण प्रभाग १) १, ( सर्वसाधारण महिला ) १, (सर्वसाधारण प्रभाग २) रिक्त, ठाकुरसाई (सर्वसाधारण महिला ) २.

Election
राज्याला मोठा दिलासा; दिवसभरात आढळला नाही ओमिक्रॉनचा रुग्ण

गुरुवारी ( ता. ९ ) अर्ज माघारीचा दिवस आहे. नाणोलीतर्फे चाकण येथील सर्वसाधारण महिला, टाकवे खुर्द येथील सर्वसाधारण व जांबवडे येथील सर्वसाधारण महिला या जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत. मात्र, त्याची घोषणा अर्ज माघारीच्या दिवशी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com