पिंपरी : हातगाडी, स्टॉल धारकांचे ‘ग’ प्रभागावर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : हातगाडी, स्टॉल धारकांचे ‘ग’ प्रभागावर आंदोलन

पिंपरी : हातगाडी, स्टॉल धारकांचे ‘ग’ प्रभागावर आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : हातगाडी, स्टॉल धारकांच्या विविध मागण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ व वर्किंग पीपल्स चार्टरतर्फे महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयावर आज (ता.२३) तीव्र आंदोलन करण्यात आले. पथारी, हातगाडी ,टपरीधारक एकजुटीचा विजय असो!फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा !कारवाई केल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? कारवाई थांबवा हक्काची जागा द्या !! अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली.

महासंघाचे अनिल बारवकर , राजू बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सलीम डांगे, कमल लष्करे, बाळासाहेब खताळ, ज्योती अग्रवाल, नवनाथ जगताप, अस्मिता होळकर, शुक्लाबाई स्वामी, कालिदास गायकवाड, अशोक जाधव, रवींद्र गायकवाड ,राजेंद्र जाधव, कृष्णा पवार, नारायण पवार, गिरिधर मोहिते, विनायक लोखंडे, उमेश गायकवाड , मीना सरवदे आदींसह ग प्रभाग कार्यक्षेत्रातील विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

हेही वाचा: कंगणाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल; शेतकऱ्यांना 'खलिस्तानी' ठरवणं भोवलं

बारवकर म्हणाले, ‘‘ संसदेने सन २०१४ मध्ये पथ विक्रेता कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. परंतु अंमलबजावणी न करता अत्यंत चुकीच्या पद्धतीने महापालिका आयुक्त आणि ग प्रभाग कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे. कारवाईमध्ये महापालिकेकडून साहित्य जप्त केले जात आहे. इकडे कर्जाचे हप्ते तर इकडे अतिक्रमण कारवाई अशामध्ये जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. महापालिकेकडून अनेक वेळा सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे आणि ठराविक लोकांवर कारवाई करायची ठराविक लोकांना सोडून द्यायचे असे प्रकार सुरू आहेत. अपंग आणि विधवा महिलांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावेळी विविध भागातून आलेल्या विक्रेत्यांनी गाऱ्हाणे आंदोलनात मांडले. यावेळी आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देत रस्त्याला अडथळा होणार नाही याची दक्षता विक्रेत्यांनी घ्यावी असे आवाहन घोडके यांनी केले.

loading image
go to top