esakal | Pimpri : शहर परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

 पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस पडतो आहे.

पिंपरी : शहर परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात सोमवारी (ता. ४) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरवासीयांची धांदल उडाली.

मागील काही दिवसापासून दुपारी कडाक्याचे ऊन जाणवत आहे. सोमवारीही दिवसभर ऊन होते. सायंकाळी पाचनंतर ढग दाटून येवू लागले. काही वेळातच जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली.

हेही वाचा: भाईंदर : कारटेप चोरणाऱ्या टोळीला भाईंदर पोलिसांकडून अटक

ढगांचा व विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. कामावरून सुटण्याच्या वेळेलाच सुरुवात झाल्याने चाकरमान्यांची धांदल उडाली. अनेकांनी पुलासह रस्त्यालगतच्या झाडांचा आसरा घेतला.

पावसाला वेग असल्याने वाहचालकांना समोरील दिसत नव्हते. यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरील ग्रेडसेप्रेटरसह सेवा रस्त्यावरही काही ठिकाणी पाणी साचले. आकुर्डी, काळभोरनगर, पिंपरीतील वल्लभनगर येथील भुयारी मार्गातही पाण्याचे तळे साचले. यातून वाहन काढताना चालकांना कसरत करावी लागली.

निगडी, मोशी टोलनाका, डांगे चौक, भोसरीतील पीएमटी चौक, नाशिकफाटा, तळवडे चौक, त्रिवेणीनगर चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

रात्री नऊच्या सुमारास काहीसा जोर ओसरला. मात्र, हलक्या सरी सुरूच होत्या.

loading image
go to top