Pimpri: इंद्रायणीचे काळवंडलेले पाणी स्वच्छ कधी होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रायणीचे काळवंडलेले पाणी स्वच्छ कधी होणार?

इंद्रायणीचे काळवंडलेले पाणी स्वच्छ कधी होणार?

आळंदी : कार्तिकीवारी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली. मात्र, इंद्रायणीचे काळवंडलेले पाणी स्वच्छ कधी होणार? असा सवाल वारकरी आणि आळंदीकर विचारत आहे. सध्या महापालिका हद्दीतून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि त्या पाण्यावर वाढणाऱ्या जलपर्णीमुळे वारकऱ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणामाची चिंता व्यक्त केली जात आहे.

गेली दोन दशके आळंदीतील इंद्रायणी नदी महापालिकेच्या सांडपाण्यामुळे बारमाही प्रदूषित होत असल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी जलपर्णीचा थर दिसून येत आहे. कधी काळे पाणी तर कधी फेसाळयुक्त पाणी वाहताना दिसत आहे. आळंदी पालिकेचे सांडपाणीही याच ठिकाणी सोडले जाते. पालिका कार्यालयासमोरील अनेक हॉटेल व्यावसायिकांचे सांडपाणी थेट इंद्रायणीत सोडले जाते.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

वारकरी इंद्रायणीतील घाण पाण्यातच तीर्थस्नान करत आहे. केवळ श्रद्देपोटी वारकरी काठावरूनच स्नानाचा आनंद घेत आहे. वारी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी आदेश काढूनही अद्याप इंद्रायणीला शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला नाही. आळंदी पालिकेनेही वडिवळे धरणातून पाणी मिळण्याबाबत पत्रव्यवहार केल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

loading image
go to top