
Morwadi Bridge
esakal
पिंपरी : पिंपरीमधील मोरवाडी येथील पीसीएमसी मेट्रो स्थानकामधील पादचारी पूल आणि जिन्याचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. निर्धारित मुदतीपेक्षा चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला; परंतु अद्याप कामे शिल्लक आहेत. परिणामी, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोरवाडी चौक धोकादायक पद्धतीने ओलांडावा लागत आहे.