पिंपरी ते निगडी उन्नत मेट्रो प्रकल्प

Pune-Metro
Pune-Metro

पिंपरी - ‘पिंपरी ते निगडी कॉरिडॉर क्र.१ ए’ या उन्नत मेट्रो मार्गिकेस बुधवारी (ता. १७) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल. यासाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार आहे. राज्य सरकारवर १७० कोटी तीन लाख इतका खर्चाचा भार असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मार्गिकेची लांबी ४.४१ किलोमीटर असून चिंचवड, आकुर्डी व निगडी या तीन स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन या विशेष वहन हेतू (एसपीव्ही) मार्फत करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा एकूण खर्चाच्या १० टक्के सहभाग असून कर्जाच्या स्वरुपात निधी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारचा एकूण ७९ कोटी ४ लाख तसेच, ९० कोटी ६३ लाख रुपये परतफेड करावयाचे दुय्यम कर्ज, असे एकूण १७० कोटी तीन लाख असा सहभाग असेल. निगडी ते स्वारगेट मार्गिकेसाठी २०२३ मध्ये ४.९५ लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होईल, असा अंदाज आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरातील बहुचर्चित मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन वेळा मेट्रोची ट्रायल रनही घेतली आहे. दरम्यान, पिंपरीतील संत तुकाराम नगर स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्वारगेट ते निगडी या उन्नत मेट्रो मार्गिकेवर आधी दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी, संत तुकारामनगर, पिंपरी महापालिका भवन या सहा स्थानकांसह आता तीन स्थानकांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे एकूण स्थानके नऊ झाली आहेत. सध्या सर्व स्थानकांच्या उभारणीचे काम सुरू आहे. या मार्गावर एकूण चार किलोमीटर दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन वेळा ट्रायल रन घेतली होती. ती यशस्वीपणे पार पडली.

निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेच्या मागणीसाठी नागरिकांनी साखळी आंदोलन केले होते. पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामकाजाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी अनेक सामाजिक संस्था व राजकीय नेत्यांनी केली होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com