पिंपरीचे नवे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचे 'हे' पैलू नक्की वाचा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

विविध गुन्ह्यांची उकल करीत गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणारे पोलिस दलातील आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून परिचित आहेत.

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. कृष्णप्रकाश हे जगातील खडतर समजली जाणारी फ्रान्समधील आयर्नमॅन ट्रायथलॉन ही स्पर्धा जिंकणारे पोलिस दलातील पहिले अधिकारी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध गुन्ह्यांची उकल करीत गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणारे पोलिस दलातील आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून परिचित आहेत.

दरम्यान, त्यांनी फ्रान्समधील ट्रायथलॉन या स्पर्धेत चार किमी स्विमिंग, 186 किमी सायकलिंग आणि 42 किमी रनिंग असे तीन खेळ प्रकार केवळ 14 तासांत पूर्ण करीत आयर्नमॅन हा किताब पटकाविला. ही कामगिरी करणारे कृष्ण प्रकाश हे पोलिस दलातील पहिले अधिकारी ठरलेले आहेत. या खेळात हे तिनही क्रीडा प्रकार सोळा तासांत पूर्ण करायचे असतात. मात्र, कृष्णप्रकाश यांनी हे सर्व प्रकार केवळ 14 तासांत करीत "आयर्नमॅन'चा किताब मिळवला. त्यामुळे त्यांना आयर्नमन म्हणूनच संबोधले जाते. 

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

यासह सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कृष्णप्रकाश यांची 2008 ते 2010 या काळातील कारकिर्द वादळी ठरली. त्यांच्या काळात जिल्ह्यातील मटका, गुन्हेगारांवर मोठी जरब बसवली. पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक स्थापन करून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांवर समांतर अशी देखरेख व्यवस्था निर्माण केली.

तसेच कृष्णप्रकाश यांनी आपल्या वक्तृत्वाने सागंलीकरांवर छाप पाडली होती. एक वक्ता म्हणून त्यांनी सांगलीतील अनेक सार्वजनिक समारंभ गाजवले. सांगलीतील त्यांची लोकप्रियता एखाद्या पुढाऱ्यासारखी होती. लोकांच्या तक्रारींची थेट लोकांत जाऊन दखल घ्यायचे. त्यांचे हे वर्तन अधिकारी म्हणून असलेल्या चौकटी मोडून काढणारे ठरले. त्याबद्दलही त्यांच्यावर सतत टीका व्हायची. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराचे तिसरे आयुक्त- पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील एकूण पंधरा पोलिस ठाण्यांचा समावेश करून 15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयत अस्तित्वात आले. आर. के. पद्मनाभन हे पहिले आयुक्त ठरले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची बदली झाल्यानंतर संदीप बिष्णोई यांची 20 सप्टेंबर 2019 ला आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. ते पिंपरी चिंचवडला येण्यापुर्वी मुंबई येथे वैधमापन शास्त्र नियंत्रक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, आता कृष्णप्रकाष हे शहराचे तिसरे आयुक्त ठरले आहेत. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri police commissioner krishnaprakash is the first Iron Man in police force