esakal | हाथरस घटनेचा सर्वपक्षियांकडून पिंपरीत निषेध 
sakal

बोलून बातमी शोधा

Protest

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (ता.11) मेहतर बाल्मिकी समाज पुणे-पिंपरी चिंचवड, सर्व राजकीय पक्ष, नागरिक, अल्पसंख्यांक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने पिंपरीत "मशाल महारॅली' काढण्यात आली.

हाथरस घटनेचा सर्वपक्षियांकडून पिंपरीत निषेध 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (ता.11) मेहतर बाल्मिकी समाज पुणे-पिंपरी चिंचवड, सर्व राजकीय पक्ष, नागरिक, अल्पसंख्यांक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने पिंपरीत "मशाल महारॅली' काढण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरीतील मिलिंदनगर येथील महर्षी वाल्मिकी मंदिर येथे मशाल प्रज्वलीत करुन रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पीडित तरूणीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. शगून चौकात या रॅलीचा समारोप झाला.

पिंपरी-चिंचवडकरांनो, खरी माहिती द्या अन् कोरोनामुक्त व्हा! 

येथे पीडित तरूणीला मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. राजकीय पदाधिकाऱ्यांसह दलित संघटनेतील नेत्यांनी मनोगत व्यक्त करीत उत्तरप्रदेश व केंद्र सरकारचा निषेध केला.

Edited By - Prashant Patil