‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनात सेल्‍फी विथ सेलिब्रिटी

पावन खिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारलेले अभिनेते अजय पुरकर यांनी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनाला भेट दिली.
Sakal Vastu Exhibition Lucke Draw
Sakal Vastu Exhibition Lucke DrawSakal
Summary

पावन खिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारलेले अभिनेते अजय पुरकर यांनी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनाला भेट दिली.

पिंपरी - पावन खिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारलेले अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनाला (Sakal Vastu Exhibition) भेट दिली. वाचकांशी संवाद साधला. ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण (Gift Distribute) केले. त्यानंतर प्रत्येक स्टॉलला त्यांनी भेट दिली. त्यावेळी वाचकांनी त्यांच्यासोबत फोटोशेशन केले. ‘सेल्फी विथ सेलिब्रिटी’ असा कार्यक्रम रंगला.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे ‘सकाळ’ वास्तू एक्स्पो आयोजित केले होते. त्याच्या शेवटच्या दिवशी अजय पूरकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी वाचकांशी संवाद साधत ‘पावन खिंड’ चित्रपटाच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी सांगितली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आठ चित्रपट काढायचे आहेत, त्यातील तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, पुढील महिन्यात आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘‘शूटिंगसाठी आम्ही सेट उभारत नाही. नैसर्गिक ठिकाणे शोधून शूटिंग करतो. लिखित स्वरूपात स्क्रिप्ट नसते, चित्रिकरणावेळीच कलाकारांना संवाद दिले जातात. ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी खूप संदर्भांची अभ्यास करावा लागतो. तो करूनच आम्ही निर्मिती केली आहे. आजपर्यंत आमच्या चित्रपटांवर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही. शिवाजी महाराज यांचे चरित्र घराघरांत पोहोचावे यासाठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.’’

‘सकाळ’ एक्स्पोमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी बक्षीस योजना होती. नागरिकांकडून कुपन भरून घेण्यात आले होते. दर दोन तासांनी ड्रॉ काढण्यात आला. त्या प्रत्येक दोन तासाला विजयी ठरलेल्या दहा जणांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. त्यांचे वितरण पुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी एक्स्पोमध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट दिली. त्या दरम्यान, नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्या वेळी नागरिकांनी त्यांच्यासमवेत ‘सेल्फी’ घेत एक्स्पोचा आनंद लुटला.

‘हर हर महादेव’चा घोष

अजय पुरकर यांनी ‘पावन खिंड’ चित्रपटाची निर्मिती, त्याची पटकथा, त्यासाठी शोधावे लागणारे संदर्भ, चित्रिकरणासाठी शोधावे लागलेले ठिकाणे याबाबतची माहिती दिली. हल्ली पुस्तके किंवा लेख फारसे कोणी वाचत नाही. शिवाय, कोणताही विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी दृश्य माध्यम प्रभावी ठरते. त्यामुळे आम्ही चित्रपटाची निर्मिती केली. शिवाजी महाराजांचे विचार, संस्कार घराघरांत पोहोचले पाहिजे, यासाठीचे प्रभावी माध्यम चित्रपट आहे, असे सांगून पुरकर यांनी केलेल्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने परिसर दणाणून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com