esakal | पिंपरी : भाजप नगरसेविकेसह दहा जणांना पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

पिंपरी : भाजप नगरसेविकेसह दहा जणांना पोलिस कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सरकारी कामात अडथळा आणने, अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर व आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकल्याप्रकरणी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह दहा जणांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. त्यांना आज न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

नगरसेविका आशा तानाजी धायगुडे - शेंडगे, पूजा अरविंद भांडारी, शीतल पंकज पिसाळ, गौरी कमलाकर राजपाल, आशा जैस्वाल, शीतल महेश जाधव, जयश्री रामलिंग सनके, संध्या रमेश गवळी, स्वप्नील भारत आहेर, संजय शंकर पवार (सर्व रा. कासारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रमोद रामकृष्ण निकम (रा. सदर्शननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

दरम्यान, गणेशोत्सव सुरू होत असल्याने कासारवाडीतील खोदकाम करू नये, अशी विनंती शेंडगे यांनी अधिकारी व ठेकेदाराला केली. तरीही कामे सुरूच ठेवल्याने शेंडगे यांच्यासह काही महिलांनी गुरुवारी (ता. ९) दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी चिंचवड महापालिका भवनात आंदोलन केले. आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडून आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली. कोरोना नियमांचे उल्लंघन करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेविकेसह दहा जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली.

आंदोलकांनी कोरोना नियमांचे पालन करून लोकशाही मार्गाने आंदोलन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी आपापसात कट रचून अंगावर शाई फेकण्याच्या उद्देशाने शासकीय अधिकारी अशोक भालकर यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या खुर्चीवर फुले व काळी शाई टाकली. तसेच त्यांच्या टेबलावर धिक्कार असो असे लिहिले.

तसेच आयुक्तांच्या दालनाबाहेर बेकायदा जमाव जमवून आयुक्तांना दालनाबाहेर पडण्यास अटकाव केला. सुरक्षारक्षक व पोलिसांना धक्काबुक्की केली. आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकून मोठमोठ्याने घोषणाबाजी केली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

loading image
go to top