esakal | पिंपरी: लोकसंख्या दहापट; नगरसेवक दुप्पट! । Pimpri
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी: लोकसंख्या दहापट; नगरसेवक दुप्पट!

पिंपरी: लोकसंख्या दहापट; नगरसेवक दुप्पट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी :महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९८६ मध्ये झाली होती. त्या वेळी शहराची लोकसंख्या दोन लाख ४९ हजार ३६४ होती, तर नगरसेवकांची संख्या ६० होती. आता ३५ वर्षांत शहराची लोकसंख्या दहापटीने वाढली असून, नगरसेवकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक अर्थात १२८ आहे. २०२१ ची जनगणना न झाल्याने महापालिकेची आगामी निवडणूकही १२८ जागांसाठीच होणार असून, त्यासाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरली जाणार आहे.

हेही वाचा: चाकणला स्थानिकांना लस मिळेना, ग्रामीण रूग्णालयामध्ये गर्दी

पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी व आकुर्डी या पाच गावांची मिळून १९७० मध्ये नगरपालिका अस्तित्वात आली होती. त्यात लगतच्या काही गावांचा समावेश करून, १९८२ मध्ये महापालिकेत रुपांतर झाले. मात्र, १९८६ पर्यंत प्रशासकच कारभारी होती. दोन मार्च १९८६ रोजी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात ६० सदस्य होते. पहिले महापौर होण्याचा मान भोसरीतील ज्ञानेश्‍वर लांडगे यांना मिळाला होता. २७ मार्च १९८६ ते १९ मार्च १९८७ असा त्यांचा कार्यकाल होता.

आता या घटनेला ३५ वर्षे उलटली आहेत. शहरात आणखी काही गावे समाविष्ट केल्याने शहराचा विस्तार झाला आहे. लोकसंख्या २५ लाखांवर पोहोचली आहे. मतदारांची संख्याही वाढली आहे. त्यानुसार महापालिकेची आगामी अर्थात फेब्रुवारी २०२२ ची निवडणूक होणार आहे. मात्र, कोरोनामुळे २०२१ ची जनगणना न झाल्याने निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्याही २०१७ इतकी अर्थात १२८ इतकीच राहणार आहे. जनगणना झाली असती तर नगरसेवकांची संख्या १४५ ते १४८ च्या दरम्यान राहिली असती. मतदारसंख्या मात्र पाच जानेवारी २०२२ पर्यंतची असेल. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील मतदान केंद्रांची संख्या मात्र मतदारसंख्येच्या प्रमाणात असेल.

"आता शहराचा विस्तार वाढला आहे. सोयी वाढल्या आहेत. कामे करताना अनेकदा अडचणी येतात, मात्र त्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सोडवायला हव्यात. लोकप्रतिनिधी कामे सुचवतात; पण अधिकाऱ्यांनीही वेळेत कामे पूर्ण करायला हवीत."- ज्ञानेश्वर लांडगे, प्रथम महापौर, पिंपरी-चिंचवड

loading image
go to top