चाकणला स्थानिकांना लस मिळेना, ग्रामीण रूग्णालयामध्ये गर्दी

ग्रामीण रूग्णालयात औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे कामगार कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी दररोज मोठी रांग लावत आहेत.
कोविशिल्ड लस
कोविशिल्ड लसMedia Gallery

चाकण : येथील ग्रामीण रूग्णालयात औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे कामगार कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी दररोज मोठी रांग लावत आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबांतील सदस्यही लसीकरणासाठी येत आहेत. कंपन्यांनी स्वखर्चाने कामगारांचे लसीकरण करावे, असे आदेश आहेत. मात्र, अनेक कंपन्या याकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णालयात लसीकरणासाठी सध्या गर्दी होत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना लस मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोविशिल्ड लस
देशातील इलेक्ट्रिक मोटारींची पहिली रॅली; आदित्य ठाकरेंच्या हस्ते हिरवा झेंडा

लसीकरणासाठी येणारे लस न दिल्यास उद्धट बोलत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णालयातील गर्दी रोखायची कशी, हा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांना लस मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. तासनतास रांगेत ताटकळत थांबूनही लस मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या रूग्णालयात लस कंपन्यांतील कामगारांसाठी आहे की स्थानिक नागरिकांसाठी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

रूग्णालयातील जुन्या इमारतीबाहेर सकाळपासूनच लसीकरणासाठी कामगार गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांतील कामगार येथे लसीकरणासाठी येत असून कुटुंबातील इतर सदस्यांना घेऊन येत आहेत. त्यामुळे महिलांचीही मोठी रांग लागत आहे. रांगेतील नंबरवरुन स्थानिक नागरिक व कामगारांत वादविवाद होत आहेत. काही प्रकरणे हाणामारीपर्यंत देखील जात आहेत. त्यातून आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कंपन्यांनी कामगारांचे लसीकरण त्यांच्या फंडातून करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

कोविशिल्ड लस
बार्शी-सोलापूर रोडवर वैरागजवळ भीषण अपघात; एक तरूण जागीच ठार तर चारजण जखमी 

कंपन्यांनी स्वतःच्या निधीतून सोय करावी : गोरे

ग्रामीण रूग्णालयात कंपन्यांतील कामगार लस घेण्यासाठी रांगा लावतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपन्यांनी त्यांच्या फंडातून कामगारांना लस उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे रूग्णालयातील व्यवस्थेवर ताण येणार नाही. कामगार व स्थानिक यांच्यात लसीकरणावरून वाद होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम गोरे यांनी सांगितले.

रूग्णालयात बहुतांश कंपन्यांतील कामगार लसीकरण घेण्यासाठी येत आहेत. मात्र, कंपन्यांनी सरकारच्या आदेशानुसार कामगारांना त्यांच्या निधीतून लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रूग्णालयात लस उपलब्ध होईल. - डॉ. नंदा ढवळे, वैद्यकीय अधीक्षक, चाकण ग्रामीण रूग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com