पिंपरी : महापालिकेचा तो सल्लागार काळ्या यादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

पिंपरी : महापालिकेचा तो सल्लागार काळ्या यादीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी ः महापालिकेने शहरातील विविध सात प्रकल्पांवर नेमणूक केलेल्या कावेरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट या सल्लागाराला काळ्या यादीत टाकले आहे. परिणामी त्याची नियुक्ती रद्द केल्यामुळे सात प्रकल्पांसाठी चार सल्लागारांची नेमणूक केली जाणार आहे.

महापालिकेकडून प्रभाग क्रमांक दोन बोऱ्हाडेवाडी येथील ताब्यात येणाऱ्या गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. प्रभाग दोनमध्येच पुणेपर्यंतचा नाशिक महामार्ग ते गट क्रमांक १०६२ मध्ये १८ मीटर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. सेक्टर क्रमांक १६ मध्ये राजे शिवाजीनगर येथील रस्ते अद्ययावत पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक नऊ नेहरूनगर येथील जुनी शाळा इमारत पाडून नवीन शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमाक आठ इंद्रायणीनगर येथील चौकातील तुलसी हाइट्स समोरील रस्ता ते पेठ क्रमांक एकमध्ये पुणे नाशिक महामार्गापर्यंत जोडणारा १२ मीटर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

हेही वाचा: 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग

प्रभाग क्रमांक आठमध्ये ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक, रस्ता दुभाजक व रोड फर्निचरविषयक कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक आठमध्ये ठिकठिकाणी पदपथ, दुभाजक आणि रस्ता सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी महापालिका पॅनेलवरील व्यवस्थापन सल्लागाराची प्रकल्प नेमणूक करण्यात येत असते.

loading image
go to top