Water Supply : आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणीपुरवठा

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आंद्रा धरणातून सोडलेले ४५ ते ५० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन इंद्रायणी नदीतून घेतले जात आहे.
chikhali Water Treatment Plant
chikhali Water Treatment Plantsakal
Summary

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आंद्रा धरणातून सोडलेले ४५ ते ५० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन इंद्रायणी नदीतून घेतले जात आहे.

पिंपरी - चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आंद्रा धरणातून सोडलेले ४५ ते ५० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन इंद्रायणी नदीतून घेतले जात आहे. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाणार आहे.

मावळ तालुक्यातील आंद्रा आणि खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून शहरासाठी प्रतिदिन अनुक्रमे १०० व १६७ असे २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी कोटा मंजूर आहे. त्याअंतर्गत चिखलीत ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. त्यासाठी इंद्रायणी नदीवर तळवडे-निघोजे येथे बांध बांधला आहे. सद्यःस्थितीत आंद्रा धरणातून विसर्ग सुरू केल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. प्रतिदिन ४५ ते ५० एमएलडी अशुद्ध जलउपसा केला जात आहे. आंद्रा धरणापासून नदी पात्रातून पाणी आणले जात आहे. निघोजे बंधाऱ्यातून पंपाद्वारे उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात आहे. तिथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी वितरण केले जात आहे.

सद्यःस्थिती

सध्या पवना धरणातून सोडलेले ५१० दशलक्ष लिटर अशुद्ध पाणी रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन उपसा केले जात आहे. तेथून निगडी प्राधिकरण सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तेथून शहरात पाणी वितरण केले जात आहे. अनियमित, कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्यामुळे २५ नोव्हेंबर २०१९पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

भविष्यातील नियोजन

शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आंद्रा व भामा-आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर आहे. त्यामुळे पवना धरणातील ५१० दशलक्ष लिटर पाणी मिळून शहरासाठी ७७७ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. शिवाय, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन आहे. हे पाणी एमआयडीसीला देऊन त्यांच्या कोट्यातील ७० दशलक्ष पवनाचे पाणी उपलब्ध होणार आहे.

चिखली अंतर्गत...

चिखली जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत २६७ दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, बोपखेल या गावांसह भोसरीचा काही भाग आणि प्राधिकरण सेक्टर एक ते १६ भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत या भागात पुरविले जाणारे पाणी शहराच्या अन्य भागात वितरित केले जाणार आहे. त्यामुळे दिवसाआड ऐवजी दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

भामा-आसखेड...

भामा-आसखेड धरणातून मंजूर १६७ दशलक्ष लिटर पाणी येण्यास आणखी किमान अडीच ते तीन वर्ष लागण्याची शक्यता आहे. हे पाणी जलवाहिनीद्वारे आणले जाणार आहे. त्याच्या जॅकवेलची निविदा प्रक्रिया झाली आहे. मात्र, धरणग्रस्त शेतकरी आणि जलवाहिनी टाकली जाणाऱ्या इंदोरी परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासह अन्य मागण्या मान्य केल्याशिवाय काम होऊ न देण्याची भूमिका घेतली आहे.

आंद्रा धरणातून मिळालेले पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून उचलले जात आहे. सध्या प्रतिदिन ४५ ते ५० दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा करून पाणी वितरण सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाणार आहे. जुन्या व नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, महापालिका

पाण्यावर प्रक्रिया

  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून विविध भागांत पाणी वितरण

अंतर (किलोमीटर)

  • 22 - आंद्रा धरण ते निघोजे अशुद्ध जलउपसा केंद्र

  • 28 - भामा-आसखेड ते निघोजे जलउपसा केंद्र

  • 6 - निघोजे बंधारा ते चिखली जलशुद्धीकरण केंद्र

  • 20 - चिखली केंद्र ते शहराचे शेवटचे टोक बुर्डे वस्‍ती चऱ्होली

पाण्याचा मार्ग

  • आंद्रातील पाण्याचा मार्ग : आंद्रा धरण ते इंद्रायणी नदी, इंदोरी, देहू मार्गे निघोजे बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रातून

  • भामा-आसखेड पाण्याचा मार्ग : वाकीतर्फे वाडा- करंजविहिरे- नवलाख उंब्रे, जाधववाडी, जांबवडे, इंदोरी मार्गे जलवाहिनीद्वारे

  • निघोजे अशुद्ध केंद्रातून : जलवाहिनीद्वारे चिखली जलशुद्धीकरण केंद्र

  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून : शुद्धीकरण प्रक्रिया केलेले पाणी जलवाहिन्या व टाक्यांद्वारे वितरण

जलशुद्धीकरण केंद्र (एमएलडी)

  • ३०० क्षमता

  • १०० आंद्रा

  • १६७ भामा-आसखेड

  • २६७ एकूण मिळणार

झालेली कामे

आंद्रा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, इंद्रायणी नदीतून पाण्याचा प्रवाह

इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा सुरू

चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रतिदिन ४५ ते ५० एमएलडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com