पिंपरी-चिंचवडकरांनो, वाहन चालवताय तर सांभाळून नाहीतर...

पिंपरी-चिंचवडकरांनो, वाहन चालवताय तर सांभाळून नाहीतर...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचा जोर हवा तेवढा नाही. मात्र, सलग सुरु असलेल्या पावसाने रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे
खड्ड्यांचाही अंदाज येत नसल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवस करीत आहेत. सेवा रस्त्यांसह काही ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची डागडुजी
पावसाळ्यापूर्वीच महापालिकेने केली होती. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांतच डांबरीकरण उखडून रस्त्यावर खडी पसरली आहे. एकीकडे कोरोनासारख्या संसर्गाला जनता तोंड देत असताना नागरिकांचा अपघात होण्याची दाट शक्‍यता रस्त्यांच्या दुर्दशेमुळे निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यमुनानगर येथील इन्फंट जिझस चर्च समोरील रस्ता, निगडीतून टिळक चौकाकडे जाणारा रस्ता तसेच भक्ती-शक्ती चौक, ट्रान्सपोर्ट नगर, तळवडेकडून त्रिवेणी नगर चौकाच्या दिशेने जाताना, त्रिवेणीनगरकडून कृष्णा नगरच्या दिशेकडे जाताना, कासारवाडी, शंकरवाडी, वल्लभनगर, संत तुकारामनगर, पिंपळे गुरव, भोसरी येथे रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. नागरीकांना वाहनांने प्रवास करताना खड्ड्यांमुळे जीव जाण्याची भीती वाटू लागली आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी रस्त्याच्या दशेतून बचावले आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिक व नोकरदार वर्गाला रस्त्याच्या भयाण संकटाला सामोरे जावे लागत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खोदकामेही रेंगाळली...

अमृत योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी पावसाळ्याच्या तोंडावर नाले, डांबरीकरण, जलनि:स्सारण, भूमिगत गटारांचे खोदकाम करून ठेवले आहे. त्याचा त्रासही नागरिकांना भेडसावत आहे. बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा बेफिकीरीच्या कामांमुळे वाहनांचे रिपेअरिंग व सर्व्हिसिंग वारंवार चालकांना करावे लागत आहे. त्यामुळे वाहन दुरूस्तीच्या खर्चाच्या त्रासालाही विनाकारण सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी गेल्यास दुचाकी इंजिनमध्ये गेल्यास थेट वाहने बंद होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com