कोरोनामुक्त झालेले नागरिक प्लाझ्मा दानासाठी पुढे येताहेत पण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत प्लाझ्मा घेऊन बरे होणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. मात्र, ऐनवेळी प्लाझ्मा दात्यांची व घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्हनंतर बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दानासाठी पुढे येत आहेत. नातेवाईक प्लाझ्मा दात्याची शोधाशोध करून कुटुंबीयांना जीवनदान देत आहेत. मात्र, अशा कठीण परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक ताटकळत रक्तपेढी बाहेर तासन्‌तास बसत आहेत.

पिंपरी  : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत प्लाझ्मा घेऊन बरे होणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. मात्र, ऐनवेळी प्लाझ्मा दात्यांची व घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्हनंतर बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दानासाठी पुढे येत आहेत. नातेवाईक प्लाझ्मा दात्याची शोधाशोध करून कुटुंबीयांना जीवनदान देत आहेत. मात्र, अशा कठीण परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक ताटकळत रक्तपेढी बाहेर तासन्‌तास बसत आहेत. कोविड सेंटरवर कोटी रुपयांची उधळण करणाऱ्या महापालिकेला मात्र, प्लाझ्मा (अफेरेसिस) मशिनचा विसर पडल्याने दात्यांचीच कुचंबणा होत असल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वांत प्रथम दात्याची तपासणी केल्यानंतरच प्लाझ्मासाठी दाखल करून घेतले जात आहे. या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागतो. मात्र, तपासण्या झाल्यानंतर एक जण प्लाझ्मा देत असताना दुसऱ्याला प्रतीक्षा करावी लागते. ऐनवेळी प्लाझ्मासाठी मागणी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. प्लाझ्मादात्याचा शोध घेण्यासाठी नातेवाइकांची धावपळ होत आहे. एवढ्या प्रक्रियेनंतर रक्तपेढीत मशिनच उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. बऱ्याचदा कामधंदा व नोकरीवरून पूर्ण दिवस वेळ काढून प्लाझ्मादाता आलेला असतो. मात्र, रक्‍तपेढीत आल्यानंतर चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यानंतर प्लाझ्मा घेण्यासाठी एका तासाचा अवधी जात आहे. मशिनची संख्या वाढल्यास वेळेत रुग्णालाही प्लाझ्मा मिळू शकतो. या मशीनसाठी नागरिक, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा करीत आहेत. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

प्लाझ्मासाठी खासगीमध्ये लुटालूट सुरू आहे. अनेक दाते प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत असताना मशिन उपलब्ध नसणे, ही खेदाची बाब आहे. किमान एक तरी मशिन उपलब्ध होणे गरजेचे आहे. 
- संजय गायखे, प्रहार रुग्णसेवक 

 

 

पुण्यातील जनकल्याणमध्ये सध्या दोन प्लाझ्मा मशिन आहेत. इतर ठिकाणी एकच आहे. वायसीएममध्ये सध्या मशिन खरेदी केल्यानंतर त्या मशिनचे करायचे काय? सध्या गरज वाटत नाही. नागरिक मागणी करत आहेत. अँटिबॉडीज टेस्टिंग करून त्यानंतर उपचाराला बराच कालावधी असतो. अत्यवस्थ रुग्णाला प्लाझ्मा न देता योग्य व्यक्तीला प्लाझ्मा मिळणे गरजेचे आहे. 
- डॉ. तुषार पाटील, रक्तपेढी प्रमुख, वायसीएम 

 

 

एकूण प्लाझ्मादाते ः 295 
रक्तपेढीत गरजेपोटी येणारे ः 30 ते 40 
रोजच्या दात्यांची संख्या ः 10 ते 12  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plasma donors wait for plasma machines